शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आजार सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:44 IST

आता ‘डेथ ऑडिट’ होणार, डाॅक्टर जबाबदार ठरणार!

जगदीश भोवड

पालघर : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याबरोबरच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना याचा जास्त त्रास होत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंचे परीक्षण (डेथ ऑडिट) होणार असून ग्रामीण भागातील डॉक्टर्सकडून कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर योग्य उपचार न केल्याने त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावून त्यांचा मृत्यू होत असल्याने त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या खाजगी डॉक्टरांना जबाबदार धरून कारवाईचे आदेशवजा पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.

पालघर जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ८९ हजारांवर गेली असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दीड हजारच्या पुढे गेली आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त नव्हती, मात्र आता दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात इतर आजार असलेल्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते कोरोनाचे बळी ठरत असल्याचेही दिसून आले आहे. 

या पार्श्वभूमीवर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या स्वाक्षरीने नुकतेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना एक पत्र जारी करण्यात आलेले असून, या पत्रात कोरोना रुग्णांची योग्य तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हे पत्र तालुका प्रशासनाच्या माध्यमातून सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे.कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्यानंतर त्यांची आवश्यक तपासणी न करता काही डॉक्टर ताप, सर्दी, खोकला आजारावर उपचार करीत असल्याने त्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावत जाते. पुढे त्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढू लागल्या आहेत. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर चाचणी न करता उपचार करणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना अशा मृत्यूस जबाबदार धरले जाणार आहे. दरम्यान, इतर आजारांमुळे जिल्ह्यात किती रुग्णांचा मृत्यू झाला त्याची निश्चित आकडेवारी मिळू शकली नाही.

प्राणवायू पातळी खालावल्यास रुग्णालयात दाखल व्हावे

ताप, सर्दी, खोकला व इतर करोनाची लक्षणे असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरकडे आल्यास त्यांना आरोग्य केंद्रांमधून अँटिजन टेस्ट करण्यास सांगावे. या चाचणीचे नकारात्मक निकाल आल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. चाचणी अहवालात आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यास जवळच्या कोरोना काळजी केंद्रामध्ये दाखल करण्याची वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णाला सूचना द्यावी, तसेच गृह विलगीकरणात राहत असणाऱ्या रुग्णांनी आपल्या शरीरातील प्राणवायूची पातळी नियमित तपासावी. प्राणवायू पातळी खालावल्यास त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारpalgharपालघर