शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेतीवाला नवरा फेम, धर्मेंद्र तरे काळाच्या पडद्याआड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:17 IST

 'रेतीवाला नवरा पाहिजे', या लोकप्रिय कोळी गीताच्या अफाट लोकप्रियतेमुळे घराघरात पोहचलेल्या पालघर तालुक्यातील सातपाटी गावाचे सुपुत्र धर्मेंद्र तरे यांचे अल्पशा आजाराने, 57 व्या वर्षी मंगळवारी दि.24 जुलै रोजी निधन झाले.

पालघर -  'रेतीवाला नवरा पाहिजे', या लोकप्रिय  कोळी गीताच्या अल्बम आणि गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. या गाण्यातील कलाकारांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या अफाट लोकप्रियतेमुळे घराघरात पोहचलेल्या पालघर तालुक्यातील सातपाटी गावाचे सुपुत्र धर्मेंद्र तरे यांचे अल्पशा आजाराने, 57 व्या वर्षी मंगळवारी दि.24 जुलै रोजी निधन झाले. ही बातमी समजल्यावर त्यांच्या चाहत्यां मध्ये दुःखाची लाट पसरली असून, त्यांच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  पालघरच्या सातपाटी येथील रहिवासी असलेल्या धर्मेंद्र च्या घरचा मूळ व्यवसाय मासेमारी.मात्र शाळेत आणि घरात ही त्याला संगीता व्यतिरिक्त काही दुसरे सुचायचे नाही.ही संगीतातील भूक शमविण्याच्या प्रयत्नात त्याने प्रथम आपला सहकारी विदेश म्हात्रे ह्यांला सोबत घेऊन "नवरा निघाला सातपाटीचा,त्यानंतर गोरी गोरी पान सातपाटीची शान ह्या दोन कॅसेट काढल्या. त्या बऱ्यापैकी चालल्या असल्यातरी त्याचे समाधान झाले नाही. वेसावे गावातुन अनेक कोळी गाणी गाजत असल्याने आपल्या गावाचे नाव ही गाजायला पाहिजे म्हणून तो नेहमीच अस्वस्थ रहात असे. मध्यंतरीच्या काळात डान्स क्लास,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, गणपती,नवरात्रोत्सवात चलचित्र डेकोरेशन ह्या व्यवसायात तो व्यग्र असताना त्याने लिहिलेले आणि संगीत दिलेले "रेतीवाला नवरा पाहिजे" हे गाणे जवळपास सर्वच लग्नमंडपात वाजू लागले.आणि सातपाटीचा हा गीतकार प्रसिद्ध झाला. सुप्रसिद्ध नट विक्रम गोखले ह्यांच्या भूमिकेतून त्याला नित्यानंद बाबा च्या जीवनावर सिनेमा काढायचे त्याचे स्वप्न त्याच्या अकाली मृत्यूमुळे अपूर्ण राहिले. कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या धर्मेंद्र यांनी निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी गाणीही लिहिली होती.त्याच्या मृत्यूने तो शरीराने ह्या जगातून निघून गेला असला तरी रेतीवाला नवरा पाहिजे ह्या गाण्या द्वारे तो लोकांच्या मनात घर करून राहिल्याचे त्याचे शिक्षक टी एम नाईक सरांनी लोकमत ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmarathiमराठी