शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुंद अभियंत्यांची बडतर्फी तोंडीच

By admin | Updated: February 7, 2017 03:52 IST

पंधरा-वीस हजार रुपये पगार असलेल्या ठेका अभियंत्याच्या बर्थ डे पार्टीतील महागडी दारु आणि फटाक्यांच्या तुफान आतषबाजीची १२ ठेका अभियंत्यांची झिंंग महापालिका

शशी करपे , वसईपंधरा-वीस हजार रुपये पगार असलेल्या ठेका अभियंत्याच्या बर्थ डे पार्टीतील महागडी दारु आणि फटाक्यांच्या तुफान आतषबाजीची १२ ठेका अभियंत्यांची झिंंग महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिलेल्या त्यांच्या तोंडी बडतर्फीच्या आदेशाने उतरली आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळपर्यंत संबंधीत ठेकेदाराला त्यासंंबंधीचे कोणतेच आदेश आयुक्त अथवा महापालिकेकडून प्राप्त झालेले नव्हते. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांशी त्यांचे असलेले संबंध मात्र यामुळे चव्हाट्यावर आले आहेत. स्वच्छ भारत अभियानासाठी केेंद्रीय पथक येणार असल्याने सुट्टी असतांनाही रविवारी महापालिकेत आयुक्तांसह सर्वांनीच हजेरी लावली होती. मात्र, दुपारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या १२ ठेका अभियंत्यांनी चाळ माफिया आणि अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बिल्डर्सबरोबर मद्यपार्टी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महापालिकेची प्रतिमा मलीन करणाऱ्या १२ अभियंत्यांची सफाई करण्याचे काम आयुक्तांना करावे लागले. या पार्टीत हे महापालिका अभियंते पल्लू के निचे छुपा रखा है, उठा दू हंगामा हो. या गाण्यावर मद्यधुंद अवस्थेत नाचतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विदेशी दारु, मच्छी,मटण आणि डीजेच्या आस्वादासह फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आल्याचे व्हिडीओत दिसून आले. वसईच्या समुद्र किनारी रात्रभर रंगलेली ही पार्टी ठेका अभियंता स्वरुप खानोलकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाळमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सनी दिल्याचे बोलले जात आहे.स्वरुप खानोलकर हा काही वर्षांपासून महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. ठेका अभियंता असतांनाही त्याने अनधिकृत बांधकामांतून लाखो रुपयांची माया गोळा केल्याची चर्चा केली जात होती. गंभीर तक्रारी झाल्याने त्यांना काही दिवस घरी बसविण्यात आले होते. पाच महिन्यांपूर्वी पुन्हा कामावर घेतलेल्या खानोलकर यांना अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचा मुख्य अभियंता नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे या पथकात तब्बल १४ कायम स्वरुपी सहाय्यक आयुक्त कार्यरत असताना अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून त्याविरुद्ध कारवाईची मोहिम आखण्याची जबाबदारी खानोलकर यांच्याकडे होती. आता आयुक्तांनी दिलेल्या या अभियंत्यांच्या तोंडी बडतर्फीच्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.