शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:06 IST

चार महिन्यांपासूनची परिस्थिती : दररोज मारतात बँकेत हेलपाटे

डहाणू : गरिबी हटवण्यासाठी, तळागाळातील गरीब लोकांसाठी असलेल्या योजनांची जाहिरातबाजी केली जात असली तरी लाभार्थी मात्र प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.डहाणू तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, तसेच राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत, वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, कुष्ठरोगी, निराधार, अशा दारिद्र रेषेखालील १२ हजार लाभार्थ्यांचे अनुदान चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातील दीनदुबळे, मागासवर्गीय, विमुक्त आणि भटक्या जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित, क्षयरोगी, घटस्फोटीत, परित्यक्ता, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा चारशे, आणि सहाशे रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. सरकारने गाजावाजा करून त्यात वाढ करत ते सरसकट १००० रुपये केले. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जून महिन्यापासून अनुदानच जमा झाले नाही.लाभार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर होऊन दोन दोन वर्षे झाली, तरीही नियोजनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वेळेवर जमा केले गेले नाही.डहाणूच्या आदिवासी भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या दिवशी, दाभाडी, चळणी, सुखड आंबा, चिंचले, निंबापुर, गांगोडी, वांगर्जे, शेनसरी, कोसेसरी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, तर किनारपट्टी भागातील चिंचणी, वाणगाव, वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, अशा लांबवरच्या गावांतील गरजवंत लाभार्थी रोज बँकेच्या दारात येऊन हेलपाटे मारीत आहेत.निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे जून, जुलै महिन्याचे अनुदान बँक खात्यात भरणा करण्याचे काम सुरू असून, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू