शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराविरोधात घडले एकजुटीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 00:27 IST

किनारपट्टीलगतच्या गावांचा, मच्छीमारांचा सरकारला इशारा; जबरदस्ती केल्यास पुकारणार एल्गार

n  हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : आपला पारंपरिक मासेमारी व्यवसाय, मासेविक्री, कडकडीत बंद ठेवून डहाणू ते मुंबईतील कफपरेड दरम्यानच्या मच्छीमारांच्या गावांनी आपल्यातील एकजुटीचे मंगळवारी दर्शन घडविले. आम्हाला उद्ध्वस्त करणारे बंदर नको. स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता, केंद्र आणि राज्य सरकार जबरदस्ती करत असेल, तर संपूर्ण किनारपट्टी एकत्र येत वाढवणमध्ये एल्गार पुकारेल, असा इशारा या बंदमधून देण्यात आला. पालघर जिल्ह्यासह मुंबईच्या कफपरेडदरम्यानच्या सुमारे आठ ते दहा हजार बोटींनी मासेमारीला न जाता, एक दिवसाच्या उत्पन्नावर पाणी सोडले, तर सर्व सहकारी संस्थांनी मासे खरेदी, बर्फ उत्पादन, साहित्य, डिझेलची विक्री, दुकाने, रिक्षा आदी सर्व व्यवहार बंद ठेवून, आम्ही सरकारला इशारा दिल्याचे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.वाढवण बंदराच्या विरोधाचा वणवा आता पालघर, मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये पसरला असून, मानवी साखळी, मासेमारी बंद, मासेविक्री बंदसह आपापल्या भागातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून वाढवण बंदराच्या विरोधातील आपला संताप व्यक्त करण्यात आला. मासेमारी व्यतिरिक्त मच्छीमारांपुढे उदरनिर्वाहाचे अन्य कुठलेही साधन नसल्याने वाढवण बंदरामुळे मासेमारीचा व्यवसाय देशाेधडीला लागणार आहे. अपघाताचे प्रमाण, प्रदूषण वाढून मत्स्यसंपदा नष्ट होत किनाऱ्यावरील घरांनाही धोका पोहाेचणार असल्याचे मच्छीमारांतून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. वाढवणसह परिसरातील तिघरे पाडा, वरोर, डहाणू आदी चार-पाच गावांतील नागरिकांनी पुन्हा सुरू केलेल्या वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासह अन्य गोष्टींना विरोध दर्शविला होता. पोलिसांचा फौजफाटा वाढवणमध्ये तैनात करून हा विरोध मोडण्याचे काम केंद्र, राज्य सरकार करू लागले होते.‘आपण हाक द्या, आम्ही हजर राहू’वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला ताकद देण्याचे काम आजच्या किनारपट्टीवरील गावांनी केले. सर्व हेवेदावे विसरून कुठल्याही दबावापुढे झुकू नका, आम्ही आपल्यासोबत आहोत, असा मेसेज आम्ही आजच्या बंदमधून देऊन, ‘आपण हाक द्या, आम्ही हजर राहू’ असा विश्वास वाढवण बंदराच्या विरोधात लढणाऱ्या बांधवांना दिल्याचे कळंबचे धीरज निजाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.