शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या पाण्यासाठी आंदोलकांचे उपोषणास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 03:04 IST

सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

पालघर: सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. मोर्चे, बंद सारख्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याच्या निषेधार्थ सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी व कवडास ह्या सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्र मगड ह्या तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या सिंचनासाठी व गावागावातील, पाड्यापाड्यातील घराना पिण्यासाठी मिळणे अपेक्षित असतांना एमएमआरडीएला हाताशी धरून राजकीय मताच्या जोरावर ते वसई-विरार व मीरा-भार्इंदर कडे वळविण्यात काही लोकप्रतिनिधी यशस्वी झाले होते. भविष्यात त्याचा मोठा फटका तिन्ही तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांवर होणार असून लोकांच्या घरात पुरेसे पाणीच पोचणार नसल्याची परिस्थिती उद्भवणार आहे. तसेच पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.शासन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करील असे आमचे मुख्यमंत्री व्यासपीठा वरून सांगत असताना मात्र सूर्या, पिंजाळ प्रकल्पाचे सिंचनासाठी, पिण्यासाठी आरिक्षत ठेवलेले पाणी बिगर सिंचन क्षेत्राकडे वळविण्यास त्यांचे सरकारच पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. ह्यामुळे पालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.आपले हक्काचे पाणी दुसरीकडे वळविण्यात येत असल्याने सर्व पक्षीय पाठिंबा असलेल्या सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या १८ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित पालघर बंद ला जिल्ह्यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. तरीही जिल्हावासीयांच्या भावनांचा कुठलाही विचार हे सरकार करीत नसल्याने आता ह्या सारकरचया दुटप्पी धोरणा विरोधात आण िस्थानिकांच्या पाण्यासाठी उद्यापासून निकराची लढाई लढण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक रमाकांत पाटील ह्यांनी दिली.>अनेक योजना ठप्प होणारपालघर मधील २६ गावे नळपाणीपुरावठा योजनेच्या पाणीपुरावठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.पिंजाळ शेती सिंचन प्रकल्प गुंडाळून हे सर्व पाणी मुंबईला वळविण्यात येणार आहे.