लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शेतकऱ्यांना साले असे म्हणत अवमान केल्याप्रकरणी शुक्रवारी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीने निदर्शने करून आपला संताप व्यक्त केली. पालघर शहरातील हुतात्मा स्तंभाजवळ निषेध व्यक्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोचून खासदार दानवेंना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने साले अशी पदवी प्रदान करीत आहोत अशा आशयाचे निवेदन काँग्रेस कमिटी मार्फत देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हाध्यक्ष केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, आबा चित्रे, दत्ता नर, शैलेश ठाकूर, रोशन पाटील तसेच कार्यकर्ते, महिला कार्यकत्या उपस्थित होत्या.
पालघरमध्ये कॉँग्रेसकडून दानवेंचा निषेध
By admin | Updated: May 13, 2017 00:40 IST