शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

२० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती; डेडिकेटेड पाॅझिटिव्ह रुग्णालयासाठी खासदार गावित यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:20 IST

डहाणू तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ६७७ मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आली. दरम्यान, काही मातांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह येतात.

 कासा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डहाणू तालुक्यात डेडिकेटेड पाॅझिटिव्ह कोरोना रुग्णालय अभावी २० कोरोना संक्रमित मातांची प्रसूती करावी लागली आहे. कोरोना संक्रमित मातांना प्रसूतीसाठी नायर हाॅस्पिटल येथे पाठवण्यात येते, मात्र ग्रामीण भागातील महिला मुंबई येथे जाण्यास तयार होत नाहीत. परिणामी डहाणू तालुक्यात समर्पित प्रसूती कोरोना केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी डहाणू येथे आरोग्य अधिकारी डाॅ. अभिजीत चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत आपण आरोग्य संचालनालयाशी बोलून तत्काळ यावर निर्णय घेण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.डहाणू तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ६७७ मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आली. दरम्यान, काही मातांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह येतात. अशा काेरोना संक्रमित महिलांना प्रसूतीसाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात येते, मात्र ग्रामीण भागातील महिला मुंबईला जाण्यास तयार नसतात.  लहान मुले तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरातील सदस्यांना परवानगी नसल्याने ग्रामीण महिला मुंबईसारख्या ठिकाणी चांगले उपचार मिळत असतानाही प्रसूतीसाठी जाण्यास तयार होत नाहीत, असे दिसून आले आहे. परिणामी डहाणू तालुक्यामध्ये समर्पित प्रसूती केंद्र नसल्याने कोरोना संक्रमित मातांची प्रसूती वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. डहाणूत एकूण २२ कोरोना संक्रमित मातांची प्रसूती करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. डहाणूत समर्पित प्रसूती कोरोना रुग्णालय सेंटरची मागणी होत आहे.

डहाणूत आयसीयू बेड वाढवण्याबरोबरच कोरोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. डहाणूत आयसीयू केंद्रासाठी ४ एमबीबीस, ४ बीएएमएस, १३ नर्सेसचा स्टाफ वाढवण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या तुलनेत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डाॅक्टरांच्या पगारवाढीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.     - राजेंद्र गावित, खासदार, पालघर