शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

देहेर्जी प्रकल्प विस्थापितांचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:44 IST

परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच

राहुल वाडेकरविक्रमगड : परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच साखरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात देहरजी मध्यम प्रकल्प उभारण्यात येत आहे़ या प्रकल्पामुळे आदिवासीचा विकास होण्यास मदत होणार आहे़ या प्रकल्पामुळे मोठ मोठे उदयोगधंदे या ठिकाणी येऊन येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी त्यामुळे उपलब्ध होतील़ मात्र, मौजे साखरे व खुडेद बुडीत क्षेत्रात ५०० घरे येत असल्याने प्रकल्पाच्या पुनर्वसन अभावी ती मोडकळीस आली आहेत़ अधिसुचना घोषीत केल्याने येथील गरीब आदिवासींना बांधकाम करणे शक्य होत नाही़ मात्र या प्रल्पाचे कामास मध्ये बरीच वर्षे गेल्याने शेतकºयांनी नविन घरे बांधलेली आहेत़ त्याचे क्षेत्र देखील वाढलेले आहे़ त्यामुळे जुन्या सर्व्हे रद्द करुन नविन सर्व्हे करुन त्याप्रमाणे विस्थापितांचे पुर्नवसन करावे अशी मागणी आहे.परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच साखरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात देहरजी मध्यम प्रकल्प उभारण्यात येत आहे़ या प्रकल्पाचा फायदा विक्रमगड व आसपासच्या परिसरातील गाव-खेडयापाडयांसही २२ गावांना होणार आहे़ मात्र या प्रकल्पाला निधीची तरतुद नसल्याने व वारंवार इतर अनेक अडचणी उद्भवत असल्याने प्रकल्पाचे काम लालफितीत अडकले होते़सध्या या प्रकल्पास निधीची तरतुद होत असल्याची माहिती हाती असून प्रकल्पाचे काम लवकच सुरु करण्यात येणार आहे़. मात्र, हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासुन (२००५) पासून रखडेला असल्याने ज्यावेळेस याचा सर्वे करण्यात आला व त्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत़ त्याची यादी तयार झाली आहे़ त्याकालीवधीनंतर विस्थापितांच्या जमीनीमध्ये अनेक बदल झालेले आहेत़ तर काहींनी नविन घरे बांधलेली आहे़ त्याचे क्षेत्र वाढलेले आहे़ त्यामुळे यामध्ये जो काही बदल झालेलो़त्याचा आहे. त्याचा पुुन्हा सर्वे करुन यामध्ये विस्थापित होत असलेल्या बांधीत शेतकºयांना योग्य मोबदला व त्यांचे पुनर्वस व्हावे अशी मागणी बाधीत शेतकºयांनी केली आहे़ अन्यथा प्रकल्पाचे काम सुरु करु देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.ह्या प्रकल्पाचे काम वर्ष २००५ पासून हाती घेण्यात आले आहे़ परंतु या प्रकल्पामध्ये शतकºयां समवेत वन विभागाची जमीनही संपादीत होत असल्याने प्रथम त्याचंी मान्यता मिळणे गरजेचे होते. त्यानंतर हिरवा कंदील मिळाल्यानंतर निधीची कमतरता व अनेक अडचणी येत असल्याने हया प्रकल्पाचे काम अध्यापही मार्गी लागण्यास विलंब झालेला आहे़ देहरजे मध्यम प्रकल्प जव्हार राज्य मार्गावर विक्रमगड गावापासुन आठ की़ मी अंतरावर असून, जांभा गावापासुन १़ ५० कि़ मी़ अंतरावर देहरजी नदीवर आहे़ हा प्रकल्प ठाणे व पालघर जिल्हयातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागात आहे़ या प्रकल्पाकरीता लागणाºया एकुण जमीनीपैकी ५३१़ १८६ हे वनजमीन व २७५़ ७४८ हे खाजगी जमीन अषी एकुण ८०६़ ९३४ हेक्टर जमीन आवश्यक आहे़या प्रकल्पास कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने १५८२५़ १४ लक्ष इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे़ या प्रकल्पाची एकुण पाणी साठवण क्षमता ९५.६० द़ ल़ घ़ मी़ ८३़ ३८ टी़ एम़ सी़ असून पिण्यासाठी १५ टक्के प्रमाणे १३़९८६ द़ ल़ घ़ मी़ व औद्योगीक वापरासाठी १० टक्केप्रमाणे ९़ ३२४ द़ ल़ घ़ मी़ पाण्याची तरतुद करण्यांत आली आहे़ धरणाची महत्तम उंची ६६़८२ मी़ एवढी असून एकूण लांबी २़२५४ मी़ आहे़ डाव्या कालव्याची लांबी चार कि़ मी़ असून ३८१ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे़ तसेच उजव्या कालव्याची लांबी २९ कि़ मी़ असून ३़ ८४९ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येते एकुण ४़ २२० हेक्टर जमीनीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. विक्रमगड तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी व पिण्यासाठी यातील पाण्याचा लाभ होणार आहेदेहरजे मध्यम प्रकल्पाचे धरण, कालवा व आनुशंगिक कामांच्या निविदेता मंजुरी देण्यात आलेली असुन, संबंधीत कामे एऩ पी़ व्ही़ आऱ प्रोजेक्ट लि़ पुणे यांना देण्यात आले आहे़ या कामाच्या निविदेप्रमाणे कामाचा त्यावेळेचा अपेक्षित खर्च रक्कम रुपये १०३़ ३२ कोटी एवढा आहे.भूसंपादनया प्रकल्पाच्या खाजगी भुसंपादनाचे सविस्तर सर्वेक्षण,बुडीत क्षेत्रासाठी जांभे-६़२२३,साखरे-२४़ ६३८, खुडेद-१८९़ ६०९ एकुण-२२०़ ४७ हेक्टर याप्रमाणे बुडीत क्षेत्रासाइी अंदाजे २२०़ ४७ हेक्टर व कालव्यासाठी निष्चिती करण्यासाठी संयुक्त मोजणीचे काम सुरु करण्यांत आले होते़पुनर्वसनमौजे साखरे गावाअंतर्गत असलेल्या हनुमान पाडयामधील ११० कुटुंबे व ९० घरे तसेच पवारपाडयातील ११ कुटुंबे व १० घरे इत्यादी त्याचप्रमाणे खुडेद गावाच्या अंतर्गत कुंडाचा पाडयामधील १४३ कुटुंबे व १०३ घरे तसेच महालपाडयामधील ८ कुटुंबे व ७ घरे यांचे पुनर्वसन करावे लगणार आहे़त्याबाबतचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्याकडे सादर केला आहे़वनजमीनप्रकल्पाकरीता लागणा-या वनजमीनीसाठी(बुडित क्षेत्र व कालवा) ५३१़ १८६ हेक्टर आवश्यक असून सदर जमीन बीड जिल्हयात उपलब्ध करुन घेण्यात आली आहे़ त्यानंतर सध्यस्थितीत फॉरेस्ट अ‍ॅडमिनिस्ट्र्ेटिव्ह कमिटीकडुन प्रस्ताव मंजुर होऊन केंद्रीय वनमंत्री यांच्याकडे निर्णयासाठी प्रलेबित आहे़हा प्रकल्प सिंचनासाठी असल्यास तालुक्यातील ४़ २३० हेक्टर ही जमीन ओली ताखाली येणार आहे़ येथील ग्रामस्थ दुबार भातशेती,भाजीपाला लागवड फलोत्पादन इत्यादी लागवड करुन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करु शकतील जेणेकरुन येथील स्थानिक आदिवासी ध्ांदयासाठी कामासाठी परगावी स्थंलांतरीत होणार नाहीत़ तसेच विक्रमगड व त्याअंतर्गत २२ गाव -पाडयांचा पाण्याचा सिंचनाचा, विकासाचा प्रश्न हा प्रकल्प मार्गी लागल्यावर सुटणार आहे़ करीता शासनाने तसेच येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व मंत्राीमहोदयांनी लक्ष घालून या प्रकल्पासाठी येणाºया अडचणी सोडवून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील जनतेकडून होत आहे़