शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

देहरजी प्रकल्प ८० टक्के पूर्ण; २०२७ नंतर भागणार तहान! विक्रमगड तालुक्यात ग्रामीण विकासाला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:38 IST

या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.

मुंबई : पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्पाचे काम आता ८० टक्के पूर्ण झाले असून, २०२७ च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे. त्यातील ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या भागातील जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे. केआयडीसीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसीने २७ जुलै २००६ रोजी पीव्हीआर प्रोजेक्ट्स यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आहे. धरणाद्वारे पाणीपुरवठा योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.

या क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी सूर्या प्रकल्पासोबतच देहरजी मध्यम प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.  या प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होऊन या भागातील सामाजिक-आर्थिक वाढीला मदत होईल.डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

कोणाला किती पाणी ?वसई-विरार महापालिकेसाठी १९० एमएलडी पाणी राखीवपाणीपुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ एमएलडी पाणीसिडको पालघर क्षेत्रासाठी ५० एमएलडीपाणी वापराची क्षेत्रे - वसई-विरार महानगरपालिका, सिडको, पालघर जिल्हा परिषद. 

टॅग्स :palgharपालघर