शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:56 IST

उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे.

सुनील घरतपारोळ : उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना लाभ मिळाला असून कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे मध्यवर्ती बँकेने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. दुसºया दिवशी म्हणजेच सोमवारीही आलेल्या प्रत्येक शेतकºयाची कर्जमाफी नोंदणी होईपर्यंत बँकेने कामकाज सुरु ठेवल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण १२,५८४ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले असून या शेतकºयांना ७३ कोटी चार लाखांचा कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीक कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाकडे एकूण ७३ कोटी चार लाख रु पयांची मागणी केली आहे. यापैकी सहा हजार शेतकºयांना सोमवारपर्यंत कर्जमाफी दिली गेली आहे. यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, जे शेतकरी घेतलेले पीककर्ज नियमित भरतात, त्यांना कुठलाही दिलासा न दिल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या नाराजीचा सूर उमटत आहेत. सावकाराकडे जाण्याची पाळी येऊ नये म्हणून व सहकारी संस्था शेतकºयांच्या अडी-अडचणीत नेहमी उभ्या राहत असल्याने त्या सुरू राहाव्यात म्हणून आम्ही नियमित कर्ज भरतो. पण आम्हाला सरकारकडून कोणताच लाभ मिळत नसून जे कर्ज थकीत ठेवतात, त्यांना मात्र कर्जमाफीचा लाभ मिळतो. यामुळे घेतलेले कर्ज भरावे की नाईलाजाने थकवावे हा आमच्यापुढे प्रश्न असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.कर्जमाफीच्या घोषणेनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल. मात्र २८ फेब्रुवारीला सरकारने दुसºया यादीमध्ये वसई तालुक्यातील ६४ शेतकºयांना लाभ मिळाला. आॅनलाईन प्रक्रियेत करण्यात येणाºया नोंदणीमध्ये प्रकरणे निकाली काढताना इंटरनेट सेवेची गती मंद असल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चांदीप शाखेने शेतकºयांच्या सोयीसाठी सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती.>अशी असेल कर्जमाफीची योजनाडिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांचे २ लाख रु पयांपर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, तेकर्ज माफ करण्यात येईल. मार्च २०२० पासून ही योजना लागू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकºयाच्या खात्यात पोहोचवली जाणार आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल त्याचेसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल.>अगदी शेवटच्या शेतकºयाची माफी नोंदणी होईपर्यंत बँकेचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेचा वेळ वाढवून कामे करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सदर कर्जमाफी ही फक्त पीक कर्जासाठी असून इतर कर्जधारकांनी नियमित कर्ज भरणा करावयाचा आहे.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक>शासनाच्या पीककर्ज माफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून बँक व्यवस्थापनेने आमची चांगली सोय केल्याने शेतकºयांमार्फत बँकेचे आभार मानत आहे.-दशरथ मगन पाटील,लाभार्थी शेतकरी, गाव भिनार, वसई>शासनाने थकीत शेतकºयांच्या कर्जाची माफी केली आहे. मात्र आम्ही दरसाल नियमित कर्ज भरणा करत आलो असतानाही सरकार आमचा विचार करत नसल्याने आता घेतलेली कर्ज भरायची की नाही, हा आमच्यासमोर प्रश्न आहे.- विश्वनाथ कुडू, शेतकरी, खानिवडे