शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:06 IST

पाण्यात पडलेल्या जिवंत वीज वाहिनीमुळे विजेचा जबरदस्त धक्का लागून एक महिला जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना वसईतील मूळगाव येथे घडली आहे.

वसई/नालासोपारा : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत जात असताना पाण्यात पडलेल्या जिवंत वीज वाहिनीमुळे विजेचा जबरदस्त धक्का लागून एक महिला जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना वसईतील मूळगाव येथे घडली आहे. यामुळे महावितरण कंपनी विरोधात वसईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्योत्स्ना हिला दोन लहान मुले आहेत. अधिक माहितीनुसार, मूळगाव परिसरातील सातमा देवी परिसरातून जोत्स्ना अल्पेश परमार (२७) या तामतलावाच्या दिशेने जात होत्या. यावेळी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी पाणीही साचले होते.या साचलेल्या पाण्यात वीज वाहिनीची जिवंत तार पडली होती. हे लक्षात न आल्याने पाण्यातून जात असताना ज्योत्स्नाला विजेचा जबरदस्त धक्का लागला. त्यावेळी रस्त्यावरील काही ग्रामस्थांनी लागलीच या महिलेला महापालिकेच्या सर डीएम पेटिट रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या प्रकरणी वसई पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे वसईतील जुनाट आणि जीर्ण वीज वितरण व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.>मूळगाव येथे घडलेली घटना दुर्देवी आहे, मात्र या एकूणच घटनेची सखोल चौकशी व तपासणी आपण विद्युत निरीक्षक तपासणी विभागाकडून करत आहोत, अन्य काही तांत्रिक चुका नेमक्या कोणी केल्या आहेत, यांच्या सखोल चौकशीनंतर दोषी आढळून येईल, त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वसई शहरात जुन्या डीपी अथवा जीर्ण झालेली वीज वितरण व्यवस्था बदलणे आदींचे काम सुरू आहे. पुढील आठ महिन्यात टप्याटप्याने ही सर्व कामे पूर्ण होतील.- दिनेश अगरवाल,अधीक्षक अभियंता, वसई सर्कल