शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटातील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:46 IST

नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत.

वसई : नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी रात्री तिघांवर आचोळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.आचोळे गावात राहणारे हेमंत चौधरी नाशिक येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीला सोडण्यासाठी सहकुुटुंब गेले होते. परत येताना शुक्रवारी कसारा घाटानजीक उंबरमाळीजवळ कंटेनर आणि त्यांच्या कारमध्ये भीषण अपघात झाला. त्यात हेमंत चौधरी (४५) यांच्यासह त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा मनोज चौधरी (२२) आणि मित्र रमेश नाईक (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मधुमती चौैधरी (३६), मुलगा धीरज चौधरी (२६) आणि मुलगी धनश्री चौधरी (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह नाशिकहून आचोळे येथील घरी आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपला मुलगा आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजताच आजारी असलेल्या काशिनाथ चौधरी यांचाही रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चौधरी कुुटुंबावर झालेल्या आघातामुळे आचोळे गाव शोकसागरात बुडाले आहे.मुलगा, नातवाच्या निधनाने वडिलांनीही सोडले प्राणमुलगा आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजताच घरी अंथरुणावर खिळलेल्या काशिनाथ चौधरी यांचाही रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात