शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात आंदोलनांनी गाजला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:24 IST

मनसेचा वीजदरवाढीविरोधात राज्य सरकारविरुद्ध मोर्चा : माकपाचा केंद्र सरकारविरोधात रास्तारोको

पालघर : पालघर जिल्ह्यात विविध आंदोलनांमुळे गुरुवारचा दिवस गाजला. माक्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केंद्र सरकारविरोधात विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिले माफ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकले.

महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पालघर येथेदेखील मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने वीजबिल माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

वाढीव वीज दरवाढीविरोधात मनसेतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारीत पालघर, सफाळे, बोईसर आदी भागात काही मनसे पदाधिकाऱ्यांना आंदोलनाआधीच ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी तयारीत असलेल्या जुना पालघर परिसरातील मनसेच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीज बिल वाटप केले. कोरोना काळात जनतेची आर्थिक गणिते कोलमडली असताना वाढीव वीज देयके म्हणजे जनतेच्या खिशावर भुर्दंड पडला आहे. एकीकडे जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना जनतेला आर्थिक दिलासा देण्याऐवजी आवाजवी वीज बिल देऊन त्यांची दिशाभूल करीत वीज दरवाढ करीत महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाट वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते, पण ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे सांगितले आहे. तसेच या भरमसाट बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून जनतेने ही वाढीव बिले भरू नयेत, असे आवाहन मनसेने केले आहे. मनसेच्या आंदोलनात जयेंद्र पाटील, भावेश चुरी, समीर मोरे, सुनील इंभाड, संदेश पडवळे, दिनेश गवई, मंगेश घरत, प्रवीण भोईर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर