शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

साठीचे दशरथ बोराडे आकर्षण , कुस्त्यांनी सांगता, यंदा महिला मल्लांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:14 IST

जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसºयांची सांगता दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांच्या सामन्यांनी यंदाही झाली, याही वर्षी जुना राजवाडा येथील प्रांगणात नगर परिषदेने कुस्त्यांचे सामने आयेजित केले होते.

हुसेन मेमन,जव्हार : जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसºयांची सांगता दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांच्या सामन्यांनी यंदाही झाली, याही वर्षी जुना राजवाडा येथील प्रांगणात नगर परिषदेने कुस्त्यांचे सामने आयेजित केले होते. रविवारी सकाळ पासून कुस्ती खेळण्यासाठी ५०० ते ५५० मल्लं आले होते. हजारोच्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन दिले.पिंपळगाव-बहुला येथील शरद धात्रक यांना जव्हार केसरी घोषित करण्यात आले त्यांना ढाल, केशरी पट्टा व नऊ हजार रोख असे पारीतोषिक नगराध्यक्ष संदिप वैद्य यांच्या हस्ते देण्यात आले. तर उपविजेता ठरलेला मागील वर्षाचा जव्हार केसरी भाऊसाहेब मार्तडराव याला माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच सामन्यांत ६० वर्षीय मल्ल दशरथ बोराडे हे आकर्षण ठरले होते, त्यांनी आखाड्यात उतरून सामनाही जिंकला त्यावेळी कुस्तीप्रेमींनी जल्लोष केला. त्यांना दोन हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक मिळाले.जुन्या राजवड्यात रसिकांची मोठी गर्दी झाली होती. यावर्षी नगर पालिकेने कुस्तीपे्रमींसाठी चांगली आसन व्यवस्था केली होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त रसिक आल्यामुळे आजूबाजूच्या वाहनांवरती, गाडयांवरती, लगतच असलेल्या पिंपळाच्या झाडावरून लोक सामने बघत होते. रात्रभर तारपा नृत्य व ढोलनाच करून सैराट झालेल्या आदिवासी बांधवांनी पुन्हा कुस्त्या खेळण्यासाठी व पाहण्यासाठी जुना राजवाडा येथे मोठ्या संख्येने जमुन कुस्त्यांचा आनंद घेतला, या लढतींसाठी लांब लांबहून नामांकीत मल्ल आले होते, विशेषत: नाशिक जिल्हा नगर, पुणे, तसेच सोलापूर जिल्ह्यातून देखील मल्ल सहभागी झाले होते. सकाळ पासून सुरू झालेल्या कुस्त्या दुपार पर्यत सुरू होत्या. कुस्त्यांच्या दंगलींची प्रथा आजही तितक्याच उत्साहात नगर पालिकेच्या माध्यमातून चालू आहे. या वेळी नगराध्यक्ष संदिप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, मुख्याधिकारी वैभव विधाते, कर्मचारी अखलाक कोतवाल, उत्तम शेवाळे, जगदीश मुकणे तसेच कुस्ती समेतीचे सभापती अशोक तांबोळी, उपसभापती हेमंत सहाणे, सुनिल ठमके, चिंत्रांगण घोलप, अनंता घोलप, संजय वनमाळी, विवेक शिरसाठ, मनिष घोलप, मंदार करमरकर, आदि उपस्थित होते. काही समिती सदस्यांनी पंचाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली.