शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

दुर्मिळ मून मॉथ पतंगाचे बोर्डीत दर्शन; संवर्धनासाठी स्थानिकांनी करायला हवेत प्रयत्न, पर्यावरणवाद्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 03:54 IST

पक्षी निरीक्षणाकरिता भावेश बाबरे हे वाणगाव परिसरात भटकंती करीत असताना, त्यांना या पतंगाचे दर्शन झाले.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : विविध रंगछटा असलेला आकर्षक मात्र दुर्मिळ असलेल्या मून मॉथ हा पतंग वाणगाव येथे चिंचणी येथील पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकाराचा छंद जोपासणारे भावेश बाबरे यांना हा आढळून आला आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी पश्चिम घाटाच्या कुशीतील अस्वाली जंगलात दुर्मिळ अटलास मॉथ हा पतंग आढळला होता. त्यामुळे या घटनेने आठवणींना उजाळा मिळाला आहे.पक्षी निरीक्षणाकरिता भावेश बाबरे हे वाणगाव परिसरात भटकंती करीत असताना, त्यांना या पतंगाचे दर्शन झाले. पांढराशुभ्र रंग, लालसर पाय असलेले आणि डोक्यावर पानाच्या आकारातील तुरा तसेच पंख फिकट हिरवट रंगाचा हा देखणा पतंग होता अशी माहिती बाबरे यांनी दिली. त्याला पाहता क्षणीच फोटो काढण्याचा मोह आवरता न आल्याने त्याचे विविध अँगलने त्याने फोटो क्लिक केले. परिसरात मान्सूनच्या आगमनासह हा मून मॉथ स्थलांतर करून आला आहे. जिल्ह्यातील विविध भागात जंगल क्षेत्र असून पक्षी अभ्यासक आणि निरिक्षण आदींची आवड असलेले भटकंतीला बाहेर पडतात. त्यामुळे दुर्मिळ कीटक व पक्षी यांची माहिती या काळात समोर येते.मून मॉथची वैशिष्ट्य:- क्टियास लुना या शास्त्रीय नावाने ओळख.- पंख सामान्यत: 4.5 इंच लांब, विस्तारल्यास 7 इंचा पेक्षा अधिक.- मादी एका वेळी 200 ते 400 अंडी घालते.जीवनमान फक्त दोन महिने किंवा त्या पेक्षाही कमी. स्थलांतर करून हा पतंग या भागात आला आहे. जिल्ह्यातील निसर्ग संपदा पाहता अनेक भागात त्याचा वावर असू शकतो. कोणत्याही पक्षी वा किटकाला ईजा पोहचू न देता, उलटपक्षी त्यांच्या संवर्धनाकरिता स्थानिकांनी पुढाकार घ्यायला हवा.-भावेश बाबरे(पक्षी निरीक्षक व फोटोग्राफर)

टॅग्स :Jara hatkeजरा हटके