शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दामू शिंगडा श्रीमंत तर गहला सर्वात गरीब उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:37 IST

अहो, आश्चर्यम्! : गावितांची संपत्ती वाढली तर वनगांची संपत्ती घटली

पालघर/नंडोरे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी पाच मुख्य उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील खाजगी व कौटुंबिक संपत्तीचे विवरण पाहता दामोदर शिंगडा सगळ्यात श्रीमंत तर मार्क्सवादी उमेदवार किरण गहला हे सगळ्यात गरीब आहेत.काँग्रेस चे उमेदवार दामोदर शिंगडा ह्यांच्या नावावर ८ कोटी ९६ लाख ८ हजार ७७ रुपये इतकी सर्वाधिक संपत्ती असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार किरण गहला हे सर्वात गरीब उमेदवार ठरले असून त्यांची संपत्ती ९ लाख ७८ हजार ८४ इतकी आहे.काँग्रेसचे दामू शिंगडा यांची संपत्ती ८ कोटी ९६ लाख ८ हजार ७७ रुपये, भाजपचे राजेंद्र गावित यांची संपत्ती ८ कोटी ७७ लाख ५० हजार ३७९, बविआचे बळीराम जाधव यांची संपत्ती २ कोटी ३३ लाख ९ हजार ३२७ रुपये, श्रीनिवास वनगा यांची संपत्ती ५४ लाख ४९ हजार ३६२ तर सर्वात कमी संपत्ती माकपचे किरण गहला यांची ९ लाख ७८ हजार ८४ इतकी आहे.या संपत्तीत जंगम, स्थावर मालमत्ता दाखविण्यात आली आहे तर स्थावर मालमत्तेत विविध प्रकारच्या शेती, बिगरशेती आदी जमिनी समाविष्ट असून जंगम मालमतेमध्ये रोख, ठेवी, शेयर्स, अशी गुंतवणूक तसेच दागिने, वाहने आदी बाबींचा अंतर्भाव आहे.काँग्रेस मधून आता भाजपवासी झाल्याने उमेदवारी मिळविलेले राजेंद्र गावित यांनी २०१६ ला काँग्रेस मधून आमदारकीची पोटनिवडणूक लढवितांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख ३५ हजार ४९३ रु पये इतकी होती. याचा अर्थ गेल्या दोन वर्षात गावित यांची संपत्ती २ कोटी २४ लाख १४ हजार ८८६ रुपयाने वाढली असल्याचे दिसते. गावित हे २०१४ ला आमदार असतांना त्यांची संपत्ती ५ कोटी ३७ लाख २३ हजार ११ रुपये होती. मात्र २०१६ ला त्यांनी भरलेल्या पोटनिवडणुकीच्या अर्जात त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख ३५ हजार ४९३ इतकी झाली म्हणजेच या दोन वर्षाच्या फरकात त्यांच्या संपत्तीत १ कोटी १६ लाख १२ हजार ३८२ रुपयाची वाढ झाल्याचे दिसते.बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांनी यापूर्वी २०१४ ला लढविलेल्या खासदारकीच्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती २ कोटी ८१ लाख १३ हजार २११ इतकी होती. या चार वर्षात त्यांच्या संपत्तीत ५२ लाख ६ हजार ११६ रुपयांनी वाढ झालेली आहे. चिंतामण वनगा यांनी लढविलेल्या खासदारकीच्या निवडणूकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती २ कोटी ८४ लाख ९ हजार ६८४ होती. मात्र त्यांचे सुपुत्र श्रीनिवास यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्ती फक्त ५४ लाख इतकी कमी दिसत आहे. याचाच अर्थ वडीलोपार्जित असलेली मालमत्ता कुटुंबांतर्गत विभागली गेली असल्याने त्यांची संपत्ती कमी दिसत असण्याची शक्यता आहे.आकडे किती खरे किती दडवलेलेअनेक चतुर राजकारणी या निवेदनातही हेराफेरी करीत असतात. त्यामुळे त्यावर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न असतो. शरद पवारांच्या मालकीची एकही कार नाही. असे त्यांचे संपत्तीचे विवरण सांगते. ते त्यांच्या पत्नीची कार वापरतात. असेही त्यात नमूद केलेले आहे. काही राजकारण्यांनी तर आपल्या पत्नीपेक्षा आपण गरीब आहोत असे दाखविणारी आपल्या संपत्तीची प्रतिज्ञापत्रे उमेदवारी अर्जासोबत सादर केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मालमत्ता आपली पण तिची कागदोपत्री मालकी नातेवाईकांच्या नावे असा शॉर्टकटही वापरतात.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018