शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भाऊबीजेच्या मुहूर्तावर एसटीसोबत ‘दमणगंगा’ही झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:31 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांनी संप मागे घेतल्यानंतर डहाणू बस आगारातून शनिवारी पहिली एसटी सकाळी ६ वाजता मार्गस्थ करण्यात आली.

डहाणू/बोर्डी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांनी संप मागे घेतल्यानंतर डहाणू बस आगारातून शनिवारी पहिली एसटी सकाळी ६ वाजता मार्गस्थ करण्यात आली. या संपात आगारातील एकूण ३०० कर्मचारी सहभागी झाले होते, ते कामावर रु जू झाल्याची माहिती व्यवस्थापक मंजिरी बेहेरे यांनी दिली. याचवेळी गुजरात परिवहनची दमणगंगा बससेवाही सुरू झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला.शहादा, बीड, कोल्हापूर, शिर्डी आदी लांब पल्ल्याच्या आठ गाड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर तलासरी, बोर्डी, उंबरगाव, कोसबाड, तारापूर या स्थानिक बसेस धावण्यास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात संप मागे घेतल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने तुरळक प्रतिसाद होता. मात्र प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियामुळे बातमी समजल्यानंतर एसटी कर्मचारी कामावर रु जू झाले तसेच प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून आले. दुपार सत्रात ३० गाड्या सोडण्यात आल्याचे आगार व्यवस्थापकांनी लोकमतला सांगितले.हा संप मागे घेतल्यानंतर कर्मचाºयांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्याची उर्मी त्यांच्यामध्ये दिसून आली.देशभरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी होत असतांना महाराष्ट्र गुजरात सीमा भागात दमण गंगा ही गुजरात परिवहन मंडळाची बस प्रवाशांसाठी दुवा असते ही बससेवा प्रतिदिन दोन फेºया डहाणू आगारात करते. संपकाळात ही सेवा गुजरात राज्य मार्ग परिवहन मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवली होती. एसटीचा संप संपताच तीदेखील सुरू झाली. त्यामुळे दोनही राज्यातील सीमावर्ती भागातल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला. सीमेलगतच्या गुजराती भाषिक लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहार होत असल्याने भाऊबीजेकरिता बहिणींनी भावाचे घर गाठण्यासाठी याच बसेसच्या सेवेला प्राधान्य दिल्याने दमण गंगाच्या बसेस महाराष्टÑ व गुजरात मधील दुवा ठरली.>डहाणू बस आगारातून ३०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते, संप मिटल्यानंतर ते कामावर रु जू झाले. पहाटेपासून स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. - मंजिरी बेहेरे,व्यवस्थपक, डहाणू बस आगार