शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आज दहीहंडीचा थरार; तरुणाईचा उत्साह शिगेला, वरुणराजाची आळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:18 IST

रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली आहे तसाच तरुणाईचा उत्साह देखील वाढला आहे.

पालघर : रविवारची कृष्णजन्माष्टमी जिल्ह्यात उत्साहात पार पडली. परंतु सगळ्यांना ओढ लागली आहे ती सोमवारी रंगणाऱ्या दहीहंडीची. आगामी वर्षे निवडणुकांचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी व चमको नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंड्यांचे आयोजन केल्यामुळे त्यांची संख्या जशी वाढली आहे तसाच तरुणाईचा उत्साह देखील वाढला आहे. घसघसीत रोख बक्षिसे, विम्याचे संरक्षण, उपचारांची सुविधा तसेच नाश्ता व भोजनाची सोय या बाबींमुळे स्त्री आणि पुरूष गोविंदा पथकांचा उत्साह यंदा प्रचंड वाढला आहे.बोर्डी : कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाकरिता रविवार २ सप्टेंबर रोजी बाजारात लगबग दिसली. आगर गावच्या हनुमान मंदिरात श्री कृष्ण सप्ताहात १६८ तास अखंड कीर्तनाची परंपरा पंचाहत्तर वर्षापासून आजतागायत सुरु आहे.आगर गावातील हनुमान मंदिरात १९३९ पासून श्री कृष्ण सप्ताह साजरा केला जातो. यंदाचे ७५ वे वर्ष आहे. पंचक्र ोशीतील सर्वात जुना व मानाचा हा उत्सव समाजला जातो. स्थानिक मच्छीमार समाज या करिता नारळी पौर्णिमेच्या समाप्तीनंतर रात्री कीर्तनाला प्रारंभ करून, अष्टमीच्या रात्रीपर्यंत सुमारे १६८ तास अखंड सुरु ठेवतात.याकरिता गावातील श्री वैष्णव भजन मंडळी व श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ यांनी नियोजन करून कीर्तनाचा हा वारसा सुरु ठेवल्याची माहिती पुरोहित धनंजय पंडित यांनी दिली.डहाणू शहर, नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, बोर्डी, झाई आणि लगतच्या गावांमध्ये विविध समाज व मंडळांकडून हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. अष्टमीच्या रात्री बारा वाजेनंतर बाळकृष्णाची मूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेऊन, पारंपरिक भजनं, गवळणी गाऊन साजरा होतो. गोपाळकाल्याला सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा सामूहिक कार्यक्र म आयोजित करून, वाडी-वस्तीतून पालखी फिरवली जाणार आहे. त्यानंतर समुद्रकिनारी विसर्जनाने उत्सवाची सांगता होईल. सोमवारच्या दहीहंडीचीही जोरदार तयारी आहे.बोईसर : येथे ५५ सार्वजनिक ४५ खासगी दहीहंडी चे आयोजन करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी व शिवसेने ची प्रत्येकी ७७७७७/- रुपये बक्षिसाची दहीहंडी असणंर आहे शिवसेनेचे या उत्सवाचे १० वे तर भाजपा चे हे पहिले वर्ष असून दोन्ही पक्षाची जोरात तयारी सुरू आहे.मनसे या वर्षी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरा न करता ५५ हजाराचा धनादेश केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून पालघर जिल्हाधिकार्याकडे सुपूर्द करणार असल्याचे मनसेचे उप जिल्हा प्रमुख समीर मोरे यांनी सांगितले. तर भाविकांची तारापूरच्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शनास दिवसभर ये जा सुरू होती या मंदिरात रात्री १२ वाजता श्रीकृष्णजन्माचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :Dahi Handiदही हंडी