शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

डहाणूची रुग्णसेवा गुजरात भरोस, उसनवारी करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:51 IST

शहराची लोकसंख्या साडेचार लाखावर गेली असून नागरिकरणही वाढले आहे. या पाश्वभूमिवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज नसल्याने रु ग्णसेवा कालमडली आहे.

डहाणू : शहराची लोकसंख्या साडेचार लाखावर गेली असून नागरिकरणही वाढले आहे. या पाश्वभूमिवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज नसल्याने रु ग्णसेवा कालमडली आहे.येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांबरोबरच वैैद्यकीय अधीक्षक तसेच वैैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेच्या गाड्यावर परिणाम झाला आहे. ब्लड बँक, सिटीस्कॅन, आ.सी.यु.लॅब, सोनोग्राफी, एम.आर.आय. व बालरोगतज्ञ, आॅरथेपेडीक डॉक्टर, भूलतज्ञ नसल्याने गंभीर आजार असणार व रात्री अपरात्री दाखल होणाºया अपघातग्रस्त रुग्णांना सरळ सेलवास येथील विनोबा भावे रुग्णालय, गुजरात राज्यातील वलसाड येथील सिव्हील रुग्णालय, ठाणे व मुंबई येथे पाठविण्यात येते. अशा प्रसंगी येथील गोर-गरीब रूग्णांना घरातील सोने गहाण ठेवून किंवा सावकारांकडून व्याजी पैैसे घेऊन रूग्णालयात जावे लागत असल्याने डहाणूतील रूग्णालये केवळ शोभेचे बाहुले ठरत आहे.येथे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र असून दररोज सुमारे शंभर बाहय रूग्ण प्रत्येक आरोग्य केंद्रात येत असतात. त्यातील गरोदर महिला, तसेच गंभीर आजारी किंवा अपघात झालेल्या रूगणांना तात्काळ उपजिल्हा रूग्णालय डहाणू येथे पाठविले जाते. परंतु उपजिल्हा रूग्णालयात सोयी, सुविधांची कमतरता असून शल्य चिकित्सक (सर्जन) नसल्याने रूग्णांना इतरत्र जावे लागते. अशावेळी शेजारचे गुजरात राज्य रुग्णांना सुश्रुशेसाठी जवळते वाटते.तालुक्यातील नव्वद टक्के रूग्ण सिल्वासा येथील रूग्णालयात उपचार करुन घेणे सोयीचे मानतात. तेथे चांगली सेवे बरोबरच केवळ नाममात्र खर्च येत असल्याने गुजरात राज्यातील दवाखाने पालघर जिल्हयातील रूगणांसाठी मोठा आधार ठरत आहे. तर येथील रूग्णालये लोक प्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे पांढरे हत्ती ठरले आहेत.डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात गेल्या चार महिन्यापासून वैैद्यकीय अधिक्षक नसल्याने लहान, मोठी शस्त्रक्रिया बंद झाली आहे. तर येथे रात्री बेरात्री येणाºया गरोदर महिलांच्या प्रसुतीसाठी रक्ताची गरज पडल्यास रूग्णांना रक्तासाठी वापी, बोरीवली येथे जावे जागते किंवा गरोदर महिलांना वलसाडच्या कस्तुरबा रूग्णालय, बलसाड सिव्हिल हॉस्पिटल किंवा सिल्वासाच्या विनोबा भावे रूग्णालयात जावे लागते. त्यामुळे संपूर्ण रात्रभर रूग्णांच्या नातेवाईकांना इकडे तिकडे धावपळ करण्याची वेळ येत असते. तर येथे गेल्या एक महिन्यापासून शवागार नादुरूस्त असल्याने वाहन किंवा रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अज्ञात व्यक्तीचे मृतदेह कुठे ठेवावे असा प्रश्न पोलीसांना सतावत आहे.दरम्यान, डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालया शेजारी शासनाने येथील रूग्णांची सोय व्हावी म्हणून ६५ लाख रूपये खर्च करून ट्रामा केअर सेंटर उभारले आहेत. परंतु गेल्या तीन, चार वर्षापासून ते धुळखात पडले आहेत. उपजिल्हा आरोग्य विभागा या ट्रामा सेंटर ताब्यात घेत नसल्याने रुग्णांची तर गैरसोय होतच आहे. वर्षातून केवळ एक दिवस जिल्हा आरोग्य विभाग डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात महा आरोग्य शिबिर आयोजि करून प्रसिध्दी घेत असते मात्र वर्षभर येथील समस्या दुर्लक्षितच असतात.सर्व काही अलबेलजिल्ह्यामध्ये ९ ग्रामिण रुग्णालये आणि ३ उप उग्णालये असून काही रिक्त पदांच्या पुर्ततेसाठी मागणी करण्यात आली आहे. मात्र, महत्वाच्या अशा स्त्री रोग तज्ञ, भूल तज्ञ, या जागा कॉन्ट्रॅक बेसिसवर भरण्यात आला आहेत. त्यामुळे प्रसूतीच्या केसेस ही समाधानकारक आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे यांनी दिली. तर आमदार आनंद ठाकूर यांनी रिक्त पदे भरण्यासाठी मागणी करुनही ती भरली जात नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार