शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वेसमस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:23 IST

दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको; त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

- पंकज राऊतबोईसर : डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या लाखो प्रवाशांची उपनगरीय (लोकल ) सेवा ही जीवनदायी असून या मार्गावरील अनेक समस्या लोकसभेच्या अनेक निवडणुका आल्या व गेल्या तरी अजूनही कायम असून त्या लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने वेळच्या वेळी सोडविल्या न गेल्याने त्याचा प्रचंड मानसिक त्रास आज चाकरमनी, महिला व वयोवृद्ध, अपंग तसेच कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याला बुलेट ट्रेनची नव्हे तर वैतरणा ते डहाणू, विरार दरम्यानच्या लोकलसेवेच्या समस्या सोडविण्याची गरज आहे.आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी - माजी खासदार (जे निवडणूक रिंगणात आहेत) त्याच बरोबर इतर ही उमेदवार आम्ही व आमच्या पक्षाने, संघटनेने डहाणू - विरार दरम्याच्या रेल्वे प्रवाशांचे काही सोडविलेल्या प्रश्नांबरोबरच आम्ही हि कामे केली ती कामे केली असे सांगून स्वत:ची पाठ थोपवून घेऊन मागील प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही लवकरच सोडवू अशी (प्रत्येक निवडणुकीत देणारी) आश्वासन या वेळीही नेहमी प्रमाणे पुन्हा देतील.मागील अनेक निवडणुकीत मतदारांनी सर्वच पक्षांना संधी देऊनही रेल्वेचे प्रश्न का सुटले नाहीत. पूर्वी हा मतदार संघ डहाणू व उत्तर मुंबई या दोन मतदार संघात विभागला होता लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला असता डहाणू मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा पाच वेळा तर एक वेळा शंकर नम निवडून आले होते, दोन वेळा भाजपा -सेना युतीचे चिंतामण वनगा, तर एक वेळा माकपचे लहानु कोम यांना मतदारांनी संधी दिली होती तर उत्तर मुंबईतून पाच वेळा भाजपाचे राम नाईक एक वेळा काँग्रेसचे (परंतु बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांनी पाठिंबा दिलेले) उमेदवार अभिनेते गोविंदा निवडून आले होते. २००९ साली लोकसभेचा पालघर हा (अनुसूचित जमाती करीता राखीव) मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला, पुनर्रचनेनंतर प्रथम बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा व पोटनिवडणुकीत भाजपचेच राजेंद्र गावित निवडून आले होते.म्हणजेच आताच्या निवडणुकीतील जवळ जवळ सर्वच पक्षांना येथील भोळ्याभाबड्या मतदारांनी कधी सलग तर कधी आलटून पालटून संधी दिली होती. तरीही त्यातला एकही जण रेल्वेच्या या समस्या सोडवू शकलेला नाही.प्रवाशांच्या नशिबी अठरा वर्षे ‘वनवास’ कुणामुळे आला? तो संपणार तरी कधी?मग आज प्रत्येक जण विकासाच्या व रेल्वे प्रश्नांबाबत बोलतात मग अजूनही प्रश्न, समस्या व अडचणी का सुटल्या गेल्या नाहीत याचे उत्तर प्रचारा दरम्यान मत मागणारे उमेदवार ,त्यांचे पक्ष व कार्यकर्ते मतदारांना देतील का ?असा प्रश्न त्रस्त रेल्वे प्रवासी विचारत आहेत.डहाणू रोडपर्यंत उपनगरी क्षेत्र जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी प्रत्यक्षात लोकल सेवा सुरु झाली एवढ्या प्रतिर्घ कालावधी लोकल सेवा सुरु करण्या करिता लागला याला रेल्वे प्रशासनाने अनेक अडचणीचे घोडे दामटवून वेळ काढूपणा केला आहे. खंबिर नेतृत्वा अभावीच हे घडले आहे.डहाणू पासून वैतरणा पर्यंतच्या रेल्वे स्थानकावरून प्रतिदिन सुमारे (सरासरी) एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात परंतु प्रवाशांना अनेक प्रश्न, समस्या, अडचणी व गैरसोयींना तोंड देऊन प्रचंड मानिसक त्रास सहन करून व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे