शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 23:39 IST

या योजनेअंतर्गत तालुक्यातील २६ केंद्रांतील शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्र म संशोधन मंडळाकडून मराठी माध्यमातील १ ते ७ वी इयत्तेकरिता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्यातील सुमारे ५९ तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्र म राबवला जात असून पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील २६ केंद्रांतील शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.प्रातिनिधिक स्वरूपात बुधवारी पाच पालकांना या संचाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमीव्हावे यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्र म संशोधन मंडळाकडून मराठी माध्यमातील इयत्ता पहिली ते सातवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिली ते पाचवी या स्तरातील विषयांची संख्या कमी असल्याने त्या अभ्यासक्र माचे तीन भागांत विभाजन करण्यात आले आहे. तर सहावी आणि सातवीच्या अभ्यासक्रमाचे चार भाग आहेत. या उपक्रमानुसार प्रत्येक भागात त्या इयत्तांच्या सर्व विषयांचा समावेश एकाच पुस्तकात करण्यातआला आहे. एक भाग संपल्यानंतर दुसरा संच अध्ययन-अध्यापनासाठी वापरला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.>शैक्षणिक वर्तुळात स्वागतओझ्याविना शिक्षण या संकल्पनेतून शासनाने हा उपक्र म राबविला असून शैक्षणिक वर्तुळात त्याचे स्वागत केले आहे. दप्तराचे वजन कमी होऊन पाठदुखी, स्नायू दुखी, मणक्यांची झीज, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण आदी आजारापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे.