शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेना युतीच्या विजयात डहाणू राहिले ‘मागे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 02:41 IST

पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राजेंद्र गावीत निवडून आले आहेत.

- अनिरुद्ध पाटीलपालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राजेंद्र गावीत निवडून आले आहेत. मात्र डहाणू विधानसभा मतदार संघात त्यांना अपेक्षे प्रमाणे मतदान झालेले नाही. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर आपला हा पारंपरिक मतदारसंघ राखण्याच्या दृष्टीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेली खेळी ही आगामी विधानसभेची जागा काबीज करण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या निकालावरून त्यांचे फासे यशस्वी झाल्याची सध्याची स्थिती आहे. मतदारसंघ पुनरचनेनुसार डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश डहाणू विधानसभा मतदारसंघात (अज १२८) झाल्यानंतर २००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाजी मारली . त्यानंतर २०१४ साली पहिल्यांदाच मोदी लाटेच्या प्रभावाने पास्कल धनारे आमदार झाले. मात्र आपला पारंपरिक बालेकिल्ला हातून निसटल्याची सल माकपला होती. सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हा गड राखण्याची संधी माकपला चालून आली. त्यांनी महाघाडीत सहभागी होतांना आगामी विधानसभा निवडणुकीत डहाणूच्या जागेकरिता सांघिक सहकार्याचा प्रस्ताव ठेऊन सहभाग घेतला. २३ मे रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे विधानसभानिहाय विश्लेषण पाहता, मात्र डहाणू शहर आणि किनारपट्टी गावे याला अपवाद आहेत. तर या मतदारसंघात नोटाचा पर्याय अधिक वापरला गेल्याचेही दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता माकपने केलेली खेळी यशस्वी ठरल्याचे सध्याचे चित्र आहे.>विधानसभेवर काय परिणाम?डहाणू विधानसभेत भाजपचा आमदार असतांना युती पेक्षा महाआघाडीला अधिक मतं मिळाली. विजयी उमेदवार राजेंद्र गावीत यांना ७२,१३९ तर महाआघाडीचे बळीराम जाधव यांना ८०,२८६ इतके मतदान झाले. येथे बूथनुसार मतदान पाहता बहुतेक ठिकाणी आघाडच आघाडीवर आहे. वरचष्मा दिसतो. कारण भविष्याचा वेध घेत माकपच्या मतदारांनी दिलेले योगदान अधिक आहे़

टॅग्स :palghar-pcपालघर