शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् डहाणू पंचायत समितीवर पडला ‘पोलिसांचा छापा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:30 IST

डहाणू पंचायत समितीवर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अनेक अधिकारी व कर्मचा-यांना अटक केली.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : डहाणू पंचायत समितीवर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अनेक अधिकारी व कर्मचा-यांना अटक केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. शहरात तो चर्चेचा विषय झाला होता परंतु त्यातून सुटका हवी असल्यास तोडपाणी करण्याची आॅफरही पुढ्यात ठेऊन या बहुरूपी पोलिसांनी या धाडीमागचे रहस्य उलगडताच घबराटीचे रुपांतर विविध विभागातील हास्यकल्लोळात झाले.पावसाळ्यातील चार महीने शेती केल्यानंतर उर्वरित आठ महीने विविध रूपं घेऊन पोटासाठी गावोगावी भटकंती करण्याचे खडतर जीवन बहुरूपींच्या वाट्याला आले आहे. महिनोंमहिने घरापासून दूर राहून पायपीट केल्यानंतरही चार पैसे गाठीला जमत नाहीत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वेळी सर्वत्र आनंदोत्सव असताना बहुरूपींचे कुटुंबीय मात्र दुसºयांच्या सुखात आनंद शोधतांना दिसतात. मुखवट्यामागून स्वत:च्या डोळ्यातील दु:ख लपवता येते परंतु बायकापोरांना पाहून काळीज हेलावते. तथापि या काळात विविध शासकीय कार्यालयात जाऊन दिवाळी मागायची आणि थोडेफार पैसे जमवून कुटुंबासोबत सण साजरा करण्याची शक्कल लढवत असल्याचे विशेष पथकातील पोलीस बनून आलेल्या या दोन बहुरूपींनी लोकमतला सांगितले. या वेळी त्यांनी पोलिसांचा गणवेश, टोपी, बेल्ट, नेमप्लेट, काळे बूट असा हुबेहूब पेहरावही केला होता.दरम्यान दात्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डहाणू पंचायत समिती मधील कृषी, बांधकाम, ग्रामपंचायत, शिक्षण आदि विविध विभागात दोन विशेष पथकातील पोलिस बनून आलेल्या बहुरूपींनी अधिकारी व कर्मचाºयांच्या पुढ्यात वॉरंट ठेऊन त्यांना आरोपी केले. शिवाय गंभीर गुन्ह्यात होणारी अटक टाळण्यासाठी तोडपाणी करावी लागेल अशी व्यावहारीक आॅफरही दिली. अधिकारी व कर्मचाºयांसाठी आधी घाबरवून सोडणारा तर नंतर काहिसा सुखद ठरणारा हा अनुभव होता. होताच शिवाय या विरंगुळ्यातून तणाव मुक्ती साधली गेल्याने त्यांनी स्वखुशीने दिवाळीही दिली. हास्यकल्लोळानंतर बहुरूपींनी आपली खंत व्यक्त केली आणि त्यांची स्वारी पुढे रवाना झाली.