शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

डहाणू-नाशिक ट्रेनची गरज असताना बुलेट ट्रेन कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

उद्धव ठाकरे यांचा सवाल : वनगांच्या कुटुंबाला भाजपाने वाऱ्यावर सोडले

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील आदिवासींचा विकास करणाºया कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वेची गरज असताना बुलेट ट्रेनचा हट्ट कशासाठी, असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत केला.ज्या चिंतामण वनगा यांनी आयुष्यभर निष्ठेने भाजपा वाढविण्याचे काम केले, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा वाढवली त्या वनगांच्या कुटुंबाला भाजपाने वाºयावर सोडले. त्यामुळे त्यांच्या अश्रूंना न्याय देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. आम्ही कुणाच्याही पाठीत वार केला नाही. भाजपाने वनगांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही तिकीट दिले असते तर आज मी युतीच्या प्रचारासाठी विक्रमगडमध्ये आलो असतो आणि तिला मोठ्या फरकाने निवडूनही आणले असते. त्यामुळे शिवसेनेवर कुणी बिनबुडाचे आरोप करू नये, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.या वेळी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार राजन विचारे, आमदार शांताराम मोरे, उदय सावंत, उपजिल्हाप्रमुख राजाभाई जाधव, तालुकाप्रमुख सागर आळशी, उपतालुकाप्रमुख प्रमोद आळशी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत भाजपा आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.फाफडा खायला गुजरातला जायचे आहे का?फाफडा खायला तुम्हाला गुजरातला जायचे आहे का... त्यापेक्षा आपली झुणका भाकर चांगली असेही ते म्हणाले. कर्नाटकच्या राजकारणाला हात घालत राज्यपालांवर तोफ डागत वाल्याचा वाल्मिकी झालाच नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी कर्नाटकच्या राज्यपालांना लगावला.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनShiv Senaशिवसेना