शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू किना-यावर स्वच्छतागृहे नाहीत, मूलभूत सुविधांअभावी पर्यटकांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:33 IST

शासन पर्यटन वृद्धीकरिता प्रयत्नशील असून कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. डहाणू तालुका हा सागरी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. मात्र येथे पर्यटकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.

- अनिरूध्द पाटील बोर्डी : शासन पर्यटन वृद्धीकरिता प्रयत्नशील असून कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. डहाणू तालुका हा सागरी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. मात्र येथे पर्यटकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.महाराष्ट्राच्या सागरी पर्यटनात डहाणू किना-याची लोकप्रियता अधिक अधिक आहे. उत्तरेकडील दिल्ली, राजस्थान, गुजरात या राज्यातील नागरिक पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने येथे येतात. शिवाय मुंबईप्रमाणेच पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरातील पर्यटक विकेंड करिता पसंती देतात. डहाणू शहरातील नागरिक सायंकाळचा वेळ पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या किनाºयावरच घालवतात. मागील काही वर्षांपासून राज्य शासनाने पर्यटन विकासाकरिता सागरी किनाºयांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये कोकण पर्यटन विकास आणि मेरीटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियानाचा समावेश आहे.मेरीटाईम बोर्डाकडून चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील झाई या गावांची निवड केली. त्यांना तीन वर्षांकरिता करारबद्ध करून निधीचे हस्तांतरण केले आहे. सागर किनाºयांची स्वच्छता आणि विविध भौतिक सुविधा निर्माण केल्यानंतर पर्यटकांना आकर्षित करून त्याव्दारे स्थानिक रोजगार वाढविणे हा त्यामागचा उद्देश आहे. शिवाय प्राथमिक सुविधांमध्ये शौचालयाचाही समावेश आहे. परंतु झाई वगळता कोणत्याही पर्यटन स्थळी शौचालये नाहीत. त्यामुळे विशेषत: महिला पर्यटकांची कुचंबणा होत आहे. किनाºयावर शौचाला बसल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते व हगणदारीमुक्तीचा बट्टयाबोळ होतो.त्यामुळे आगामी दिवाळी व पर्यटन हंगामा पूर्वी तालुक्यातील सागरी पर्यटन स्थळी शौचालये बांधण्यात यावीत अशी मागणी जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभुमीवर स्थानिकांनी केली आहे.चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड बोर्डी येथे निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार निधी वर्ग केला असून शौचालये बांधण्याचे निर्देश दिले आहेत.- नवनीत निजाई,बंदर निरीक्षक , मेरीटाईम बोर्ड