शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत सहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिक्षकच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 05:20 IST

शोकांतिका : जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

डहाणू : गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचा आधार असलेल्या डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात गेल्या सहा, सात, महिन्यांपासून वैद्यकीय अधिक्षक नसल्याने शिवाय चार डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने येथे येणाऱ्या शेकडो रूग्णांची प्रचंड गैरसोय होत असून या बाबत अनेक वेळा तक्रार करून देखील जिल्हा आरोग्य विभाग गांभिर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या डहाणूत उपजिल्हयाचा दर्जा असलेले रूग्णालय आहे. शंभर खाटांच्या या रूग्णालयात डहाणू तालुका व परिसरातील दररोज सुमारे दोनशे बाहयरूग्ण येत असतात. शिवाय रात्री बेरात्री घात अपघातांचे गंभीर जखमी झालेले रूग्ण तसेच गरोदर महिला प्रसूतीसाठी मोठया संख्येने येथे येत असतात. परंतु रक्तपेढी सोनोग्राफी, एम.आर. आय., सीटीस्कॅन, बरोबरच अनेक सोयी सुविधा नसल्याने रूग्णांना इतर शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जवळ असलेल्या गुजरात राज्यातील रूग्णालयात रुग्णांना पुढील उपचारासाठी न्यावे लागते.डहाणू तालुक्यात नऊ प्राथमिक अरोग्यकेंद्रे तसेच शंभरपेक्षा उपकेंद्र आहेत. तर कासा येथे उपजिल्हा रूग्णालय असून वाणगांव येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु या सर्व ठिकाणी रूग्णलयाची प्रशस्त इमारत असली तरी अत्याधुनिक मशीन्स तसेच औषधांचा तुटवडा असल्याने येणाºया रूग्णांचे हाल होत असतात. दुर्गम भागांतून येणाºया दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना तर कर्ज, उसनवारीने पैसे उभे करावे लागतात. अनेक औषधे रक्त तसेच सोनोग्राफी, सीटी स्कॅन खाजगी रूग्णालयातून करावे लागत असल्याने असंख्य रूग्ण तर उपजिल्हा रूग्णालयाऐवजी गुजरात येथील सेवाभावी रूग्णालयात उपचार घेत असतात. दरम्यान डहणूच्या उपजिल्हा रूग्णालयात चार डॉक्टरांची बदली, प्रमोशन झाल्याने नवे वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिक्षक नसल्याने शासकीय कामकाजांसाठी तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी विलंब होत आहे.आरोग्य विभाग उदासीनउपजिल्हा रूग्णालयाबाबत पालघरचे आमदार अमित घोडा यांनी वारंवार जिल्हा आरोग्य विभागाला लेखी पत्र देऊन येथील रूग्णांना सोयी, सुविधा अपुºया असल्याची तक्रार केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार