शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

डहाणू किनारा चार तास अंधारात, असह्य उकाड्याने नागरिकांची वैतागवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:57 IST

वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील गावे अंधारात बूडाले होते.

डहाणू : वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील गावे अंधारात बूडाले होते. त्यामुळे असहय उकाडयाने हैराण झालेल्या ग्रामस्थांना तब्बल चार तास रस्त्यावर काढण्याची वेळ आली.मान्सून पूर्व पावसाच्या सरींमुळे महावितरणाचा कारभार उघड्यावर पडला. यंदा ९७ टक्के पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून जून-जुलैमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असणार असल्याने येथील नागरिकांना पावसाळ्याच्या काळात कायम अंधारात राहवे लागणार का असा प्रश्न विचारला जात आहे.विशेष म्हणजे या परिसरामध्ये महावितरण कंपनीच्या प्रशासनामार्फत दर शुक्रवारी दिवसभर वीज पुरवठा खंडीत केला जातो. असे असताना दुसऱ्या दिवशी लगेचच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने अदल्या दिवशी काय दुरुस्ती केली असा प्रश्न गावकºयांकडून विचारला जात आहे.डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वानगांव, वरोर, फिडर अंतर्गत चाळीस ते पन्नास गाव तसेच त्यांना जोडून असणारे पाडे येत असल्याने विजेचा लंपडाव त्रास दायक वाटत आहे. महावितरण कंपनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बील पाठवते या बाबत आतपर्यंत अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यातच सेवा देताना कंपनी अपयशी ठरत आहे.दरवर्षी पावसाळयाच्या काळात येथे विजेचा लपंडाव असतो. या भागामध्ये झपाटयाने वाढत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण पाहता येथे वीजेचा खांब, ट्रान्सफार्म, वीज वाहिन्या बदण्याची आवश्यकता असतांना तो बदल व दुरुस्त्या होत नसल्याने वारंवार वीज पूरवठा खंडित होत आहे.शनिवारी मेघ गर्जनेसह वादळी वारे सुरू झाले. मात्र, पावसाचा थेंब ही या परिसरातील गावांत पडला नसला तरी बोईसर येथे बिघाड होऊन चार तास नागरिकांना अंधारात राहावे लागले. या बाबत अनेकांनी दुरध्वनी करुन माहिती घेतली असता त्यांना कुणीही निटसे उत्तर दिले नाहीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणूकीत विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी चार वर्षापूर्वी येथील वीजेची समस्या सोडवून हा परिसर भारनियमन मुक्त केला होता. त्यामुळे त्यांनी शासन दरबारी येथील वीजेचा प्रश्न सेडवून डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांत चोवीस तास वीज पूरवठा सुरळीत होईल या साठी प्रयत्न करण्याची मागणी येथील नागरिकांनी एका निवेदनाव्दारे केली होती.विजेचा खांब पडल्याने १७५ गावे रात्रभर अंधारातमनोर : संध्याकाळी वादळी वाºयामुळे टेन नाका येथे विजेचा खांब वाकून पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे १७५ गाव पाडे रात्रभर अंधारात राहिले. या प्रकारामुळे वयोवृद्ध व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. महावितरणच्या ढिसाळ कारभारामूळे मनोर टेन, करलगाव, पोचाड,े दुर्वेस, सवरे, एमबुर, भोपोली, केव येथील विजेचे खांब गंजलेले आहेत.या प्रकरणी येथील अनेक गावातील गावकरी व सरपंच यांनी लेखी तक्रार करुनही महावितरणकडून साधी दखलही घेण्यात आलेली नाही. अनक वायर लोंबलेल्या आहेत.शनिवारी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे वाडा-मनोर मार्गावरील दोन खांब वाकल्याने वायर्स लोबकळत होत्या. सुदैवाने त्याचा स्पर्श कुणासही न झाल्याने अपघात टळला. या वाहिन्यावर येथील शेकडो गावातील वीज पुरवठा आधारीत असल्याने महावितरण टिकेचे धनी झाले. येथील अस्लम शेख यानंी लोकांना जागृत केल्याने अपघात टळला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार