शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची फसवणूक केली, बिल्डरला अटक; २१ जणांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 03:03 IST

टेम्भोडे येथील महेंद्र पाटील ह्या बिल्डर ने विविध आमिषे दाखवून ५ कोटी ८५ लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी ठाणे कारागृहात केली.

पालघर : टेम्भोडे येथील महेंद्र पाटील ह्या बिल्डर ने विविध आमिषे दाखवून ५ कोटी ८५ लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी ठाणे कारागृहात केली.आरोपीच्या मालकीची मौजे टेम्भोडे येथे जमीन असून तिच्यावर ओरिएंटल इंटरप्रायजेस या नावाने कंपनी उघडली. या जमिनीवर १७ बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरू करून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देतो अशा जाहिराती त्यांनी विविध ठिकाणी प्रदर्शित केल्या. एक ठराविक मुदतीत २ लाख ५० हजार रु पयांची रक्कम भरल्यास त्यांना ६५० रुपये स्क्वेअर फूट दरा प्रमाणे फ्लॅट बुक करून उर्विरत रक्कम हप्त्याने किंवा कर्ज काढून भरावी व ती मुदत संपल्या नंतर बुकिंग केल्यास अशा ग्राहकांना ८५० रु पये तर उशिराने बुकिंग केलेल्या ग्राहकांना ९०० रु पये स्क्वेअर फूटचा भाव देण्याच्या स्कीमच्या जाहिराती लावल्या. त्यांना भुलून फिर्यादी हरेश्वर लखू पागधरे रा.खारेकुरण आदी २१ लोकांनी फ्लॅट बुकिंग केले. बुकिंग, रजिस्ट्रेशन व इतर खर्च असे एकूण १ कोटी १६ लाख ८४ हजार १५० रु पये धनादेश आणि रोखीने घेतले. त्या रक्कमे च्या पावत्या, व प्रॉमेसरी नोट तक्रारदाराना दिल्यानंतर फ्लॅटचा ताबा अथवा फ्लॅटचे रजिस्ट्रेशनची मागणी केली असता आरोपीकडून टाळाटाळ झाल्याने शेवटी फिर्यादी आणि अन्य २१ तक्रारदारांनी धर्मेंद्र भट्ट यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार पालघर पोलीस स्टेशन मध्ये तक्र ार दाखल करण्यात आली.आरोपी विरोधात एमपीआयडी कलम ३ सह महाराष्ट्र आॅनरशीप फ्लॅट अ‍ॅक्ट कलाम ३,४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Arrestअटक