शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विहित नमुन्यात माहिती भरून न दिल्याचा लाभार्थ्यांना फटका; मोखाडा पं. समितीचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:03 IST

अर्ज प्रलंबित; लाभार्थी वंचित

हुसेन मेमनजव्हार : कातकरी जमातीचे संरक्षण तथा विकास योजनेअंतर्गत कातकरी समाजासाठी घरकुल योजना सुरू असून याची प्रक्रिया आदिवासी विकास विभागाकडून राबवली जात आहे. मात्र, तरीही दोन वर्षांपासून या समाजातील लाभार्थ्यांना घर मिळत नसल्याचे वृत्त शुक्रवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. यासंबंधात अधिक माहिती घेतली असता मोखाडा पंचायत समितीकडून येणारे प्रस्ताव विहित नमुन्यात नसल्याने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्याकडून ते परत पाठविण्यात आल्याचे समजले. यामुळेच आजतागायत लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मोखाडा तालुक्यातील काही लाभार्थ्यांनी तर २०१७ पासून प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, पंचायत समितीच्या या तांत्रिक चुकीचा त्यांना फटका बसला आहे.

तालुक्यातील आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना घरकूल योजना मिळावी, यासाठी पंचायत समिती मोखाडा येथे पात्र लाभार्थ्यांनी घरकूल योजनेचे अर्ज कार्यालयात सादर केले होते. त्यानुसार २० डिसेंबर २०१७ रोजी एकूण ३२ लाभार्थ्यांची पहिली यादी जव्हार प्रकल्पात पाठविण्यात आली. तसेच मोखाडा पंचायत समितीकडून मार्च २०१८ मध्ये एकूण ५७ लाभार्थ्यांच्या यादीसह जव्हार प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला. यानुसार एप्रिल २०१८ मध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या जव्हार प्रकल्प कार्य क्षेत्रातील एकूण २०३ अर्ज प्रस्तावासोबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारचे नोडल आॅफिसर, प्रकल्प अधिकारी ए.आ.वि. प्रकल्प, डहाणू यांना सादर केले होते.

याबाबत, डहाणू प्रकल्प कार्यालयातील संबंधित कार्यासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोखाडा पंचायत समितीकडून आलेले प्रस्ताव हे विहित नमुन्यात नसल्यामुळे त्यावर आक्षेप घेत तसे मे २०१८ मध्ये मोखाडा पंचायत समितीला पत्र आणि ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. तसेच हे अर्ज विहित नमुन्यात भरून पाठवण्याबाबतही सांगितले असूनही त्यांच्याकडून अद्याप विहित नमुन्यात प्रस्ताव आलेला नाही. तसेच १ नोव्हेंबर २०१९ च्या टपालात देखील पुन्हा तीन लाभार्थ्यांचे प्रस्ताव डहाणू कार्यालयाला मिळाले असून ते अर्ज देखील विहित नमुन्यात नाहीत.

मोखाडा पंचायत समिती कार्यालयाला याबाबत वारंवार सूचना देऊनही विहित नमुन्यात अर्ज प्राप्त होत नाहीत ही गंभीर बाब आहे. यामुळे तीन वर्षापासून लाभार्थी लाभापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे संबंधित विभागावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांना संपर्क केला असता, कार्यालयात जाऊन हे अर्ज मला पहावे लागतील, असे सांगितले. यासंदर्भात माहिती घेऊन मग सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.संबंधित पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत आलेले सर्व अर्ज नोडल आॅफिस प्रकल्प कार्यालय, डहाणू यांच्याकडे एप्रिल २०१८ मध्येच पाठविले आहेत. - प्रशांत साळवे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार