शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या नावावरून उलगडला खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:23 IST

शुक्रवारी दुपारी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत योगिता देवरे हिची हत्या करून डी मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिलेला तिचा मृतदेह सापडला होता.

नालासोपारा : शुक्रवारी दुपारी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत योगिता देवरे हिची हत्या करून डी मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिलेला तिचा मृतदेह सापडला होता. या हत्येचा छडा पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने लावला असून चौघांना अटक केली व फरार तिघांचा शोध सुरू आहे.नालासोपारा पूर्वेकडील डी मार्ट जवळील साई सिद्धांत काँप्लेक्स मधील बी/402 मध्ये सुशील मिश्रा आणि हत्या झालेली योगिता देवरे हे राहत होते. सुशील मिश्रा याने तीन लग्न केलेल्यापैकी एक बायको उत्तर प्रदेश, दुसरी बायको पार्वती माने पूर्वेकडील डॉन लेन येथे दोन मुलींसोबत राहत होती तर तिसरी बायको मयत योगिता त्याच्यासोबत राहत होती. पार्वती माने ही पती सुशील हा पैसे व शरीरसुख देत नसल्याने व मुलींकडेही लक्ष देत नसल्यामुळे नाराज होती. पार्वतीने आपल्या अल्पवयीन मुलींसोबत मिळून योगीताचा काटा काढण्यासाठी प्लॅन आखून हत्या करण्याकरिता मदत म्हणून ओळखीच्या माणसाला बोलावले तर दोन्ही मुलींनी आपापल्या प्रियकराला सोबत घेतले. लहान मुलीच्या प्रियकराने आपल्या मित्राला या कटात सामील करून घेतले. २८ फेब्रुवारीला सुशील हा लग्नकार्यासाठी अहमदाबादला गेला होता आणि याच दिवशी योगीताचा खून करायचे या ७ जणांनी ठरवल्यानंत रात्री १२ च्या सुमारास बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला खूप दारू पाजवून त्याच्या रूममध्ये नेऊन झोपवले. योगिता ही घरी झोपेत असताना ओढणीच्या साहयाने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. मोठ्या मुलीचा प्रियकर शैलेश काळे याने त्याचा मित्र नीरज मिश्रा याची रिक्षा (क्र मांक एम एच 48 बी एफ 1317) खोटे कारण सांगून आणली होती त्यात योगीताचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून रिक्षातून नेऊन मोकळ्या जागेत फेकून दिला होता. या रिक्षाच्या पाठी मागे लिहलेल्या जान्हवी हे नाव सीसीटिव्हीच्या शूटींगमध्ये चित्रीत झाले. त्यावरून छडा लागला.