शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह सुमारे २०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:54 IST

हे आंदोलन करताना कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे त्यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर हा खड्डेमय झालेला रस्ता गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत करावा, या मागणीसाठी जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक आणि पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी कुडूसनाका येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. हे आंदोलन करताना कुठलीही परवानगी न घेता केल्यामुळे त्यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.वीरेंद्र ठाकरे, विलास पाटील, प्रमिल पाटील, महंमद खान, दीपक पाटील, प्रमोद जाधव, कल्पेश ठाकरे, मितेश भोईर, जयेश जाधव, मयूर पाटील, अविनाश जाधव, साईनाथ जाधव अशी अटक केलेल्या आंदोलकांची नावे आहेत. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्र वारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावरील वाडा ते भिवंडी या दरम्यानचा रस्ता प्रत्येक पावसाळ्यात नादुरु स्त होऊन रस्त्याची चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी आणि अपघात हे नित्याचेच होऊन बसले आहेत. गणपतीचा सण हा दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्तादुरुस्तीबाबत उपाययोजना करण्यात न आल्याने जिजाऊ संघटनेतर्फे कुडूसनाका येथे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांचा आदेश झुगारला होता.>विनापरवानगी वाहतूक रोखून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वाडा पोलिसांनी निलेश सांबरे यांच्यासह १५० ते २०० कार्यकर्त्यांवर साथीचा रोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.