शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वसई किल्ल्यात चित्रीकरण करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा; पुरातन शिलालेख असलेल्या दगडांवर पेटवली चूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:42 IST

संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.  

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : ऐतिहासिक वसई किल्ल्यातील फ्रान्सिसन चर्च येथे पुरातत्व विभागाच्या आवश्यक नियमावली न पाळता चित्रीकरण केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीनुसार, १८ व १९ डिसेंबरला मालाड येथील आरंभ इंटरटेनमेंट या खासगी कंपनीमार्फत वसई किल्ल्यातील पुरातन फ्रान्सिस्कन चर्च येथे चित्रीकरण सुरू होते. चित्रीकरणादरम्यान, पुरातन शिलालेख असलेल्या दगडांवर चूल पेटवून पुरातत्व अधिनियमांचा भंग केल्याची तक्रार वसई पुरातत्व विभागाने पोलिस ठाण्यात दाखल केली.त्यानुसार संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.  

चुकीच्या धोरणांमुळे नियमांचे पालन नाही 

फ्रान्सिसन चर्चच्या डाव्या बाजूस जिथे चित्रीकरण करण्यात आले, ती जागा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. पोर्तुगीज व मराठा यांच्या युद्धानंतर प्रसिद्ध ठरलेल्या तहाची बोलणी या जागी करण्यात आली. त्यामुळे इतिहास संशोधक या जागेचा आजही अभ्यास करीत असतात. पुरातत्त्व विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे या जागेवर आवश्यक नियमावलींचे पालन केले जात नाही. 

शुल्क मिळत असल्याने केले जाते दुर्लक्षपुरातत्त्व विभागामार्फत चित्रीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापोटी या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करतात. तसेच चित्रीकरणादरम्यान सुरक्षारक्षक संबंधित खासगी कंपनींना सूचना देत नाहीत. परिणामी संपूर्ण किल्ल्यातील ऐतिहासिक अवशेष नष्ट झाले आहेत. किल्ले वसई मोहीम परिवार व काही दक्ष नागरिकांनी पुरातत्त्व विभागाला यावेळी कानउघडणी केल्यामुळे संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai Fort: Film crew booked for damaging ancient stones.

Web Summary : A film company faces charges for violating archaeological rules at Vasai Fort. They allegedly cooked on ancient inscribed stones, prompting a police complaint. Negligence by archaeological officials is also under scrutiny.