शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंथरुणात पडलेल्या मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:49 IST

भूमाफियांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केल्यानंतर महसूल विभागाच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : भूमाफियांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केल्यानंतर महसूल विभागाच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पक्षघातामुळे अंथरुणावर असलेल्या एका पदाधिकाऱ्यालाही आरोपी म्हणून गोवण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच न्यायालयानेही पोलीस आणि महसूल अधिकाºयांना फटकारले.राजीवली येथील जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा बांधकाम करणाºया भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीसाठी मनसेने आंदोलन सुरु केले आहे. यावेळी तहसिलदार किरण सुरवसे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. पण, त्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी पोलीस बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले. निवासी नायब तहसिलदार स्मिता गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात मनसेचे विभागप्रमुख विजय केळुस्कर यांनाही आरोपी करण्यात आले आहे. केळुस्कर गेल्या सहा महिन्यांपासून पक्षघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे केळुस्कर आंदोलनातही सहभागी झाले नव्हते. त्यानंतरही पोलिसांनी धरपकड करून त्यांना न्यायालयात हजर केले. केळुस्करांची अवस्था पाहिल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना फटकारले.