शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पर्यटनासाठी गेलेल्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू, अर्नाळा किल्ला समुद्र किनाऱ्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 21:14 IST

चौकशी केली असता हे दोघे ही विरारच्या जी एम कॉलनी  येथील गुलाब स्वामी दर्शन इमारतीमध्ये राहणारे असल्याचे तपासात उघड झाले...

नालासोपारा :- विरारच्या अर्नाळा किल्ला येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. शिवाजी  शिंदे (४८) आणि रंगीता शिंदे (४२) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव असून ते विरारच्या जी एम कॉलनी परिसरात राहत होते. 

विरारच्या भागात अर्नाळा किल्ला परिसर आहे. या किल्ल्यावर विविध ठिकाणच्या भागातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. शनिवारी सायंकाळी किल्ल्यात शिवाजी शिंदे व त्याची पत्नी रंगीता शिंदे हे दोघे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळ झाली तरीही ते याच भागात फिरत असल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. मात्र रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.  या घटनेची माहिती येथील ग्रामस्थांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. 

चौकशी केली असता हे दोघे ही विरारच्या जी एम कॉलनी  येथील गुलाब स्वामी दर्शन इमारतीमध्ये राहणारे असल्याचे तपासात उघड झाले. वज्रेश्वरी येथे दर्शनाला जातो सांगून हे घरातून बाहेर निघाले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघे पाण्यात बुडाले की आत्महत्या केली याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू