शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आज पालघरची कडेकोट बंदोबस्तात होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:58 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदाना मधील ४६.५० टक्के वरून ५३.२२ टक्के अशा ६.७२ इतक्या टक्केवारी मध्ये झालेल्या मतदार वाढीच्या गोंधळाचे पडसाद आज जिल्हा प्रशासनात उमटले.

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदाना मधील ४६.५० टक्के वरून ५३.२२ टक्के अशा ६.७२ इतक्या टक्केवारी मध्ये झालेल्या मतदार वाढीच्या गोंधळाचे पडसाद आज जिल्हा प्रशासनात उमटले. या गोंधळाच्या वातावरणात गुरुवारी मतमोजणी होणार असून भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये विजयासाठी जोरदार चुरस दिसणार आहे.मतमोजणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून निवडणुकी दरम्यान ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅट मशीन मधील बिघाड आणि टक्केवारी घोषित करण्यामध्ये झालेली गफलतिचा परिणाम निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या जमावावर होण्याची शक्यता आहे. ह्यावेळी विजयी आणि पराभूत उमेदवारामध्ये वाद उद्भवून व राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडून जिल्हा प्रशासनाला मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या साठी सुरक्षा यंत्रणेला सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत ७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४६.५० टक्के अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र रात्री उशिरा मतपेटया जमा झाल्या नंतर प्रत्यक्षात ९ लाख ७४ हजार पुरु ष मतदारा पैकी ४ लाख ८१ हजार ७४२ पुरूष मतदारानी तर ८ लाख २३ हजार ५९२ स्त्री मतदारापैकी ४ लाख ५ हजार ९२७ स्त्री मतदारानी व १८ इतर मतदारानी असे एकूण ८ लाख ८७ हजार ६८७ मतदारानी ५३.२२ टक्के मतदारानी मतदान केले असे सांगण्यात आले.पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीत डहाणू विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५३ हजार. ६८ मतदारा पैकी ८७ हजार ३७४ पुरूष मतदारानी तर ७० हजार ८९० स्त्री मतदारानी व इतर २ मतदारानी असे एकूण १ लाख ४९ हजार २६६ मतदारानी ५८.९८ टक्के मतदान केले आहे.विक्र मगड विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५२ हजार २७५ मतदारापैकी ८२ हजार ३८१ पुरूष तर ७५ हजार ६४९ स्त्री मतदारानी असे एकूण १ लाख ५८ हजार ३० मतदारानी ६२.६४ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला आहे.पालघर विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५९ हजार ९३४ मतदारा पैकी ७८ हजार ३२० पुरूष तर ६६ हजार ५७७ स्त्री मतदारानी व इतर ८ मतदार असे एकुण १ लाख ४४ हजार ९०५ मतदारानी ५५.७५ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला आहेबोईसर विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५८ हजार ४७५ मतदारा पैकी ८२ हजार ९२८ पुरूष तर ६८ हजार ९०४ स्त्री मतदारानी व इतर १ मतदार असे एकूण १ लाख ५१ हजार ८३३ मतदारानी ५८.७५ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला आहे.नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील ४ लाख ३२ हजार ६०८ मतदारा पैकी ८७ हजार ७५० पुरूष तर ६२ हजार ९३० स्त्री मतदारानी व इतर १ मतदार असे एकुण १ लाख ५० हजार ६८७ मतदारानी ३४.८३ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला आहे.वसई विधानसभा क्षेत्रातील २ लाख ७४ हजार ७३५ मतदारा पैकी ७१ हजार ९८८ पुरूष तर ६० हजार ९७७ स्त्री मतदारानी व इतर ६ मतदार असे एकुण १ लाख ३२ हजार ९६६ मतदारानी ४८.४० टक्के मतदान करून आपला हक्क बजावला आहे. पालघर, बोईसर, विक्र मगड या भागात सेनेची ताकद असून जिंकण्याच्या आकड्यापर्यंत पोचण्यासाठी त्यांना वाडा,वसई,नालासोपारा विधानसभा क्षेत्रातून पुरविलेल्या रसदीवर अवलंबून राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे भाजप विरोधातील दलित,मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्या मतदारां पुढे काँग्रेसचा उमेदवार सक्षम नसल्याने हा मतदार वर्ग सेनेकडे वळल्यास त्याचा फायदा सेनेला होऊन ते भाजप ला विजया पासून रोखू शकतात. तर भाजप चे उमेदवार राजेंद्र गावितांना मानणारा वर्ग, नालासोपाराचे मतदान कमी झाल्याने व भाजप ने मुख्यमंत्री, आदित्य योगी नाथ सह मनोज तिवारी ह्यांना ह्या मतदारक्षेत्रात उतरविल्याने त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. तसेच विवेक पंडितांची श्रमजीवी संघटना मदतीला आल्याने तसेच सोबत निलेश सांबरे, राष्ट्रवादीने भाजपला केलेली छुपी मदत आदी कारणाने भाजप विजयाच्या शर्यतीत पुढे असून बविआच्या भाजप शी असलेल्या संबंधाने भाजपला ताकद दिल्यास त्यांना विजयांपासून कोणी रोखू शकणार नाही.बविआ ची पुरी भिस्त वसई,नालासोपारा, बोईसर ह्या आपल्या विधानसभा क्षेत्रातील आपल्या हक्काच्या मतदारा वर अवलंबून असली तरी ५० टक्के च्या आसपास मतदान झाल्याने त्यांना जिंकण्यासाठी इतर मतदारसंघातून पुरेसे मतदान होणे आवश्यक आहे. तीनच पक्षात विजयासाठी चुरस दिसून येणार असून मतमोजणी साठी मोठा जमाव जमण्याची शक्यता आहे.८०० कर्मचाऱ्यांचा ताफा मोजणीसाठी केला आहे तैनातराज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणुकीच्या (आज) गुरु वारी होणाº्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी हि पालघरमधील आर्यन मैदानाच्या मागे असलेल्या सूर्या वसाहतीमधील शासकीय गोडाऊन येथे सकाळी ८ वाजता चोख पोलीस बंदोबस्तात सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय आधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतमोजणीसाठी डहाणू, विक्र मगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा क्षेत्रांसाठी ६ सहाय्यक निवडणूक अधिकारी कक्षाची उभारणी करण्यात आली असून विधानसभा निहाय प्रत्येकी १४ मतमोजणीची टेबले मांडण्यात आले आहेत. येथील मतमोजणी केंद्रात सुमारे ८०० निवडणूक कर्मचारी कार्यरत राहणार असून झालेल्या मतदानाची ३३ फेºयांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल अशा पद्धतीचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय मदत कक्ष,पत्रकार कक्ष, अग्निशमन दल कक्ष,मतमोजणी अधिकारी कक्ष,सुरक्षारक्षक कक्ष आदींची उभारणी करण्यात आलेली आहे.