शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाविरोधात नगरसेवकांचेच आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:03 IST

वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांसोबत प्रशासनाविरोधात सोमवारी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

वाडा : नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या महिलांना कामांचा मोबदला मिळावा यासाठी तसेच रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांसोबत प्रशासनाविरोधात सोमवारी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.वाडा ग्रामपंचायत कार्यकाळात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत वाडा नगर पंचायत क्षेत्रातील १०७ लाभार्थ्यांना शौचालये मंजूर होऊन त्यांचे काम पूर्ण करण्यात आले होते. नंतर नगर पंचायत अस्तित्वात येऊन या लाभार्थ्यांचे अनुदान नगर पंचायतीकडे आले असूनही वेळोवेळी मागणी करूनही आजपर्यंत हे अनुदान या लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही. वारंवार मागणी करूनही मोहोंड्याचा पाडा येथील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात येत नाही. मार्च २०१९ या महिन्यात सुमारे ८० महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत नगर पंचायतीमार्फत रोजगार देण्यात आला होता. मात्र या कामांचा मोबदलाही नगरपंचायत प्रशासनाने दिलेला नाही.शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ते तत्काळ भरण्यात यावेत, आदी मागण्यासाठी नगरसेवक रामचंद्र भोईर, अरुण खुलात आणि नगरसेविका ऊर्मिला पाटील यांनी आंदोलन केले.> नगर पंचायत प्रशासन आम्हा नगरसेवकांना थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढूपणा करत असेल तर नागरिकांनी प्रशासनाकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्न निर्माण होतो. जोपर्यंत आमच्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.- रामचंद्र भोईर, नगरसेवक>पंचायत समिती प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून लवकरच शौचालय अनुदान व कामाचा मोबदला मिळवून दिला जाईल.- सागर साळुंखे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वाडा.