शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कॉरिडॉरचा मार्ग आता उन्नत, वस्तीवर वरवंटा फिरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:31 IST

विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे.

वसई : विरार-आलिबाग कॉरिडॉरमुळे येथील औद्योगिक वसाहतीवर विस्थापित होण्याचे ढग आता निवळले असून, रेल्वेच्या बहुचर्चित विरार-आलिबाग कॉरिडॉरचा मार्ग आता बदलण्यात आला आहे. रेल्वेने पहिला नकाशा चुकीचा असल्याचे मान्य करून सुधारित नकाशा सादर केलाय नवीन नकाशानुसार हा कॉरिडॉर उन्नत मार्गाने जाणार असून एकही औद्योगिक कंपनी आणि निवासी घर विस्थापित होणार नाही. यामुळे वसईच्या औद्योगिक क्षेत्रात कमालीचा आनंद पसरला आहे.रेल्वे तर्फेविरार ते पनवेल दरम्यान १२६ किलोमीटरचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ७ हजार कोटी असून तो २०२२-२३ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा ९ किलोमीटरचा मार्ग वसई पूर्वेतून जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या मार्गाचा नकाशा सादर करताना वसई पूर्वेतील भूमापन क्र मांक ३७ मधून हा मार्ग जाणार असल्याचे दाखवले होते. हा संपूर्ण पट्टा औद्योगिक क्षेत्राचा आहे. त्यामुळे येथील ७० टक्के उद्योग धंदे विस्थापित होण्याची भीती व्यक्त होत होती. या विरोधात तीव्र आंदोलन उभे राहू लागले होते. औद्योगिक वसाहतीत २५०० छोटे-मोठे उद्योग धंदे व ५०,००० कामगार काम करीत आहेत.शिवसेनेने या प्रकरणी आवाज उठवला होता. तसेच, आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना निवेदन देत औद्योगिक वसाहतीवर वरवंटा फिरवून हा प्रकल्प उभारू नये, म्हणून विनंती केली होती. वाढता जनक्षोभ पाहून वसईचे प्रांताधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामास तात्पुरती स्थगिती दिली होती. अखेर मुंबई रेल्वे विकास महामंडळास ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी सुधारित नकाशा सादर केला आहे.>अशी जाणार मार्गिका: नवीन नकाशानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे उपमुख्य अभियंता खैरातीलाल पांचूराम मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार-पनवेल कॉरिडॉर भूमापन क्र मांक २४, २७ (ब), ६३ (अ), ३३, ३८ अ, ३३ आणि ३२ तसेच रेल्वेच्याच जागेतून जाणार आहे. हे सर्व भूमापन क्र मांक अवघ्या काही गुंठ्यांचे आहेत.>औद्योगिक वसाहतीत कमालीचा उत्साहविरार आलिबाग कॉरिडॉर आपल्या मार्गातून जाणार नसल्याचे समजताच वसईच्या औद्योगिक क्षेत्रात जल्लोष करण्यात आला. मिठाई वाटण्यात आली. विस्थापित होण्याची टांगती तलवार जी डोक्यावर होती, ती निघून गेल्याचे उद्योजकांनी सांगितले. आमची औद्योगिक वसाहत यापुढे सुरळीत राहणार आहे, असे वसई इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर यांनी सांगितले. प्रकल्प राबविताना यापुढे शासनाने स्थानिकांचे हित लक्षात घेऊन आणि चर्चा करून निर्णय घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.