शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: संसर्ग पसरवणाऱ्यांना कोण आवरणार? कोरोना वाटत फिरणाऱ्यांविषयी चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:37 IST

वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनानेही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत.

- जगदीश भोवडपालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनानेही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने निर्बंध जारी केलेले आहेत, तरीही अनेक लोक विनामास्क बाजारांत, रेल्वे प्रवासांत फिरताना दिसत असल्याने आणि त्यातीलच कुणी बाधित झाला तर त्याला तो आजारी पडत नाही तोपर्यंत माहिती पडत नाही; मात्र तोपर्यंत त्याने अनेकांना कोरोनाची भेट दिलेली असते. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये  १ ते २८ मार्चदरम्यान ३ हजार ६७७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, या कालावधीमध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. दरम्यान, पालघर ग्रामीण भागात बुधवारी ११४, तर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये  २१९ रुग्ण सापडले. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आजवर बाधित रुग्णांचा आकडा ५० हजारपेक्षा अधिक झालेला आहे, तर बाराशेहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता नागरिकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे; परंतु तरीही अनेक लोक बेफिकीरी दाखवत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. बाधित झालेली व्यक्ती ही मध्यंतरीच्या काळात अनेकांना भेटलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक तसेच मित्रमंडळी यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.  लोकलमध्ये वाढताहेत विनामास्क प्रवासी पालघर जिल्ह्यातील बरेच लोक मुंबई तसेच ठाणे येथे नोकरी-धंद्यानिमित्त जात-येत असतात. त्यांचे प्रवासाचे साधन लोकल रेल्वे तसेच एसटी बसेस हेच आहे. त्याचप्रमाणे काही लोक स्वत:च्या वाहनांद्वारे प्रवास करीत असतात; परंतु लोकल प्रवासामध्ये बहुसंख्य लोक कोरोना नियमांचे पालन करताना आढळत नाहीत. बरेच लोक मास्क हनुवटीच्या खाली ठेवून बसलेले असतात. त्यांना नियम पाळणारे काही प्रवासी मास्क वापरण्यास सांगतात, तेव्हा हमरीतुमरीचे प्रकारही घडताना दिसत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस