शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आर्थिक मंदीतून सावरणारी पायपीट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:30 IST

Coronavirus : वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरं लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवसाय उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची प्रत्येकालाच जाणीव झाली आहे. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी काही भाजी विक्रेते मैलोन मैल पायपीट करताना रस्त्यावर दिसून येत आहेत. यामध्ये भाजी विक्रेते मंदीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रस्त्यावर पूर्णच शुकशुकाट...त्यात कडाक्याचं पडलेले ऊन... उन्हापासून बचावासाठी कुठलेच डोक्यावर संरक्षण नाही...हाती पाण्याची बॉटल ही नाही...निव्वळ भाजीपाला लादलेली हाती सायकल हाकत नालासोपारा पूर्वेतील असंख्य छोटे भाजी विक्रेते राजोडी ते अर्नाळा भागातून पायपीट करत आहेत.  विशेष म्हणजे वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे. त्यामुळे असंख्य विक्रेत्यांना संध्या वसई, नालासोपारा व विरार मधील गावपट्ट्या तून भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यातच शहरात अत्यावश्यक सोडून खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मंडईत भाजीचं पोहोचत नाही आहे. त्यामुळे भाजी विक्रीसाठी माल कुठून आणावा असा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला होता.

दरम्यान या प्रश्नांवर मात करण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी सायकल हाती धरत अर्नाळा, राजोडी परिसर गाठायला सुरुवात केली आहे. रोज दुपारनंतर हे भाजी विक्रेते चार-पाच सायकलीसह अर्नाळा परिसरात जातात. तेथील स्थानिक शेतकऱ्याकडून भाजी खरेदी करून ती सायकलवर लादून आपले घर गाठतात. त्यानंतर या भाज्या आपआपल्या परिसरात विकतात. त्यांतून काही पैसे हाती लागल्यावर आपली गुजराण करत आहेत.

विशेष म्हणजे या भाजी विक्रेत्यांना आर्थिक मंदी सतावत आहे. या मंदीतून कसे सावरायचे अशा विचारात ते गुरफटले आहेतं. तज्ज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. त्यामुळे ते अशाप्रकारे भर दुपारच्या उन्हात भली मोठी पायपीट करून भाजी विक्रीद्वा रे सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्रयत्न नक्की त्यांना मंदीतून सावरण्यास काही अंश मदत ठरेल अशी अपेक्षा बाळगून ते आहेत.

भाजी विकता येत नसल्याने मंदीची चिंता सतावते होती. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी आम्ही राजोडी वरून माल आणून विकत आहोत. यामधून थोड फार तरी सावरता येईल.

आत्माराम गुप्ता, भाजी विक्रेता

घरची आर्थिक घडी सोडवण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो आहे. असे किती दिवस विना धंद्याचे काढता येणार आहेत. त्यामुळे आम्ही इतक्या लांबून माल आणून विकत आहोत.

राकेश यादव, भाजी विक्रेता

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार