शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रुग्णाला मदत करणाऱ्या तिघांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 23:55 IST

विरारमधील प्रकार; संपर्कातील पत्नी-मुलांसह सात जण बाधित

विरार : वसई-विरार महापालिकेच्या बेफिकिरीमुळे मृत्यू झालेल्या विरार-नारिंगी येथील ७८ वर्षीय कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांसोबत राहून मदत करणाऱ्यांपैकी तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.विरार-नारिंगी येथील या ज्येष्ठ नागरिकाला ३१ मे रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अनेक रुग्णालये फिरल्यानंतर त्यांची १ जूनला कोरोना चाचणी करण्यात आली. ३ जूनला ती पॉझिटिव्ह आली. पालिकेकडून त्यांना रिद्धीविनायक रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेत चालकाशिवाय पालिकेचा कोणीही कर्मचारी नव्हता. त्याच्या मुलाला माझ्यासह अन्य तिघांनी या रुग्णाला रुग्णवाहिकेत बसवण्यासाठी मदत केल्याचे सुदीप कांबळे यांनी सांगितले. रुग्णालयात नेल्यानंतर तीन तास झाले तरी रुग्णाला दाखल करण्यास किंवा तपासणी करण्यास डॉक्टर आले नव्हते. या वेळेच्या अपव्यवयात रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर चार तास उलटूनही पालिकेचा कर्मचारी अला नव्हता, असे कांबळे यांनी सांगितले. या रुग्णाचा मुलगा, त्याची पत्नी आणि मुलगी आणि स्ट्रेचरवरून अ‍ॅम्बुलन्समध्ये ठेवणारे तिघे, तसेच रिक्षाचालक यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.मुलगा रुग्णालयात दाखल, प्रतिव्यक्ती २५० खर्चविलगीकरण कक्षात प्रतिव्यक्ती २५० रु पये खर्च करावे लागणार असल्याने प्रत्येकाच्या घरांत प्रत्येकी पाच व्यक्ती असल्याने १४ दिवसांसाठी त्यांना आठ ते दहा हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र, तेथून त्याला लीलावती रुग्णालयात हलवले आहे. तर, पत्नी आणि मुलीला वसईतील कॉलेजमध्ये विलगीकरण कक्षात ठेवल्याचे सुदीप कांबळे यांनी सांगितले.रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका आली तेव्हा पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्यासोबत का नव्हते? त्यामुळे त्यांना इतर दोघांनी रुग्णवाहिकेत स्ट्रेचरवरून ठेवले. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार घ्यायची?- महेश कदम, शहर सचिव, मनसेवसईतील रु ग्णालये कोविड रु ग्णांना तुच्छतेने वागवताना दिसतात. यामुळेच एका व्यक्तीचा नाहक जीव गेला आहे. रुग्णालयांनी माणुसकी दाखवणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारून रु ग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप देत आहेत. याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे.- नरेंद्र पाटील, नगरसेवक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या