शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

CoronaVirus News: नालासोपारात सामाजिक अंतराचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:01 IST

महानगरपालिकेची केवळ बघ्याची भूमिका : नागरिकांमध्ये बेफिकिरी कायम

नालासोपारा : मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वसई-विरारमध्ये एन्ट्री घेत जनजीवन हादरवून सोडले आहे. रोजच्या रोज वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम व्यवसाय आणि मानवी जीवनावर होत आहे. दुसरीकडे नालासोपारा-विरारमधील कोरोनाचा उद्रेक प्रचंड आहे, मात्र नागरिक कोरोनाला अजिबात गांभीर्याने वागत नसल्याने सामाजिक अंतराचे तीनतेरा उडत असून कोरोनाला आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे.नालासोपारा पूर्व परिसरात तर सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते. येथे भरणाऱ्या बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकते.वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती भयंकर झाली असून गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार ४ हजार ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडादेखील हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र तरीही बहुसंख्य नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने चिंता वाढली आहे.मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला मज्जाव करण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. हळूहळू कोरोनाबाबतीतील भय नागरिकांमधून कमी होत गेल्याने कोरोनाला गांभीर्याने घेतले जात नाही. नालासोपाऱ्यात तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यासारखेच नागरिक वागत आहेत. नालासोपाऱ्यातील सध्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. नालासोपारा-विरार ही दोन्ही शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली असताना नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.