शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रुग्ण पॉझिटिव्ह असताना उरकले लग्न, वरात मंडळींवर ओढवलं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 17:12 IST

काही दिवसांपूर्वी एक पॉझिटिव्ह बस चालक हा नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला, तो एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला

हुसेन मेमनजव्हार - ग्रीन झोनमध्ये असलेला जव्हार तालुक्याला गालबोट लागले असून, सध्या शहरात १० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एका शासकीय बस चालकाच्या संपर्कात आलेल्या खासगी दवाखान्याच्या तीन नर्स व एका व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाली असून, काही दिवसांपासून या चौघांच्या संपर्कात असलेले शेकडो रुग्ण व कुटुंबीयांची आरोग्य विभागाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक पॉझिटिव्ह बस चालक हा नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला, तो एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात पाठविले, तेथून त्याचे स्वाब दोनवेळा पाठविण्यात आले, मात्र अहवाल निगेटिव्ह आले, यात पाच ते सहा दिवसांचा अवधी लागला, दरम्यान तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील त्या दवाखान्यातील कर्मचा-यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले, शुक्रवारी उशिरा यातील तीन नर्स कर्मचारी तर एका व्यवस्थापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.दरम्यान व्यवस्थापकाचे लग्न कार्यही अहवाल येण्यापूर्वीच उरकले, त्यामुळे दवाखान्यातील उपाचारासाठी आलेले रुग्ण तथा लग्न कार्यासाठी जमलेली मंडळी अशी मोठी संख्येनं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठे संकट कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्वाब घेतलेले रुग्ण बाहेर कसे गेले, नोकरीवर कसे गेले, आता हा प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिकांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबाबत विरोध केला आहे. शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या