शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

CoronaVirus News : प्रसिद्ध यात्रोत्सवांवर कोरोनाबाधेचे विघ्न!, विक्रेते-व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 23:43 IST

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने तसेच त्यामुळे मृत्युदरही वाढत असल्याने तालुक्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवांवर यंदाही गदा येणार आहे.

विरार : वसई-विरारमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा वसईकरांवर पुन्हा लॉकडाऊनचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे लग्नसमारंभ साधेपणाने साजरे करण्याचे, तसेच आठवडा बाजार, मानवी संचारावर रात्री बंदी आल्याने नागरिकांना पुन्हा घरात अडकून पडावे लागले आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याने तसेच त्यामुळे मृत्युदरही वाढत असल्याने तालुक्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवांवर यंदाही गदा येणार आहे.एप्रिल व मे महिन्यांत वसई तालुक्यात श्री हनुमान जयंती, गुढीपाडवा, श्री रामनवमी यासारख्या उत्सवांच्या निमित्ताने मोठे यात्रोत्सव भरविले जातात. या यात्रोत्सवांना वसई तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी होते. तसेच या यात्रोत्सवांमध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. मागील वर्षी कोरोनाच्या सावटाखाली वसईतील प्रसिद्ध यात्रोत्सव साधेपणाने साजरे झाले होते. यंदाही कोरोनाने डोके वर काढल्याने महत्त्वाचे यात्रोत्सव साधेपणाने साजरे होण्याची चिन्हे आहेत. जवळ येऊन ठेपलेल्या यात्रोत्सवांना शासनाकडून परवानगी नसल्याने ग्रामस्थ तथा देवस्थान कमिटीकडून शास्त्रोक्त पूजा करून यात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात्रेत दरवर्षी रेलचेल असणारे आकाशपाळणे, खेळण्यांची दुकाने लावणारे, मिठाई व्यावसायिक यांची यात्रोत्सव नसल्याने उपासमार होणार असून बच्चे कंपनीचा देखील हिरमोड झाला आहे. 

प्रसिद्ध यात्रा-उत्सव१४ एप्रिलला गुढीपाडवा, २१ एप्रिल रोजी श्रीराम नवमी, २७ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती, ३० एप्रिल रोजी जुचंद्र येथील प्रसिद्ध चंडिकादेवीचा यात्रोत्सव तसेच पुढे मे महिन्यात तुंगारेश्‍वर पर्वतावरील यात्रोत्सव, वज्रेश्‍वरी येथील यात्रोत्सव होणार होते, मात्र वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने यात्रांना खीळ बसणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस