शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मुंबई-ठाण्याने वाढवली चिंता, कोरोनाबाधित ५० हजाराहून जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 03:22 IST

coronavirus News : पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- जगदीश भोवडपालघर : जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांचा सातत्याने शेजारील मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांशी संबंध येत असल्याने आणि हे तीनही जिल्हे सक्रिय जिल्ह्यांत समाविष्ट असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये मंगळवारी १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पालघर जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी स्वरूपाचा असून येथील नागरिक नोकरी तसेच कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाणे तसेच नाशिक या जिल्ह्यांमध्ये सातत्याने जात-येत असतात. तसेच शेजारील गुजरात राज्यामध्येही सीमावर्ती भागातील नागरिक नोकरी-धंद्यानिमित्त जात असतात. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात राज्यामध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तीन जिल्हे आणि एका राज्याशी पालघरमधील नागरिकांचा सातत्याने संपर्क होत असल्याने आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच प्रशासनातील अन्य घटक सजग झाले असून कोरोना नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढाकार घेताना दिसत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई, ठाणे तसेच नाशिक या तीन जिल्ह्यांसह शेजारील गुजरात राज्यातील नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच जिल्ह्यातील नागरिकही कामाधंद्यानिमित्त शेजारील जिल्ह्यांमध्ये तसेच गुजरातमध्ये जात-येत असतात.  रेल्वे, एसटी, खाजगी वाहने यातून ही प्रवासी वाहतूक होत असते. मात्र अद्याप तरी कोणत्याही ठिकाणी चाचणी होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गुजरातमधून खाजगी वाहनांनी महाराष्ट्रात येणारे लोक मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा अवलंब करीत असतात,  मात्र तलासरी तालुक्यातील चेकनाक्यावर त्यांची तपासणी केली जात नाही, परंतु गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी गुजरात पोलिसांनी सुरू केली असल्याचे दिसून आले आहे. nकोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सज्ज झाले असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.  दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा एसटी बसपालघरमध्ये गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन सक्रिय जिल्ह्यांमधून येणाऱ्यांची तसेच या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शकडो प्रवासी एसटीतून येत-जात असतात. हे प्रवासी कोरोनाचे वाहक ठरू शकतात. मात्र अद्यापही प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत नाही. ट्रॅव्हल्सजिल्ह्यात गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही पुरेशा प्रमाणात तपासणी केली जात नाही. त्यामुळे नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर आदेश मिळताच तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.  रेल्वेजिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईला तसेच ठाणे येथे नोकरीसाठी जात असतात. अनेकांना रेल्वेसेवेचाच आधार घ्यावा लागतो. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रेल्वेमध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत नसल्याचेही दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर