शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : पालघर जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंधांचे, पोलीस प्रशासनाचा जागोजागी चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 23:38 IST

CoronaVirus Lockdown : राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते.

पालघर/नालासोपारा : वाढत्या कोरोनाचा वेग रोखण्यासाठी राज्य शासनाने शनिवारी आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाने जागोजाग चोख बंदोबस्त लावल्याने व नागरिकांनी स्वतःहून घरात राहून प्रतिसाद दिल्याने वसई-विरार महापालिकेसह पालघर जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट असल्याने कडक वीकेण्ड लॉकडाऊन यशस्वी झाला आहे.राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. पण याला दुकानदार, व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक, ज्वेलर्स असोसिएशन अशा विविध संघटनांनी विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध केला होता. यामुळे शुक्रवारी रात्रीपासून वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिक प्रतिसाद देतात की नाही, याबाबत पोलीस प्रशासनाला शंका होती. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्ह्यासह वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रभारी अधिकाऱ्यांनी जागोजाग नाकाबंदी व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी साथजव्हार : जव्हार शहरात नागरिकांनी शनिवारी कडक निर्बंधांचे काटेकोर पालन करत कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दिवसभर शहरात सर्वच दुकानांचे शटर डाऊन अन्‌ रस्ते सामसूम होते. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शासनाच्या शनिवार, रविवारच्या विकेंड लॉकडाऊन आदेशाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. एकीकडे राज्य शासनाने  जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शनिवार, रविवारीही मुभा दिली असली तरी दुसरीकडे मात्र खासगी दवाखाने व मोजक्या मेडिकलशिवाय सरसकट दुकाने बंद होती. सकाळपासूनच जव्हार शहराच्या चारही नाक्यांवर व एस.टी. स्टँड बायपास रोडवर पोलिसांनी गस्त वाढवली होती.प्रवासी वाहनांसह नागरिकांनाही अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याने गल्लीबोळात पोलीस गस्त घालीत उद्घोषणा करीत होते. दिवसभर शहर व परिसरात पोलीस वाहने फिरत असल्याने नागरिकांनी देखील घराबाहेर पडणे टाळले. यामुळे मुख्य शहरी भागांसह उपनगरीय परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघरVasai Virarवसई विरार