शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

CoronaVirus Lockdown News: हाॅटेलबंदीने हिरावला गेला गोरगरीब महिलांचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:37 IST

हाॅटेल, खाणावळी बंदचा फटका : पोळी-भाकरी बनवणारे हात रिकामे

- सुनील घरत पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने हॉटेल व खाणावळी बंद करून त्यांना फक्त पार्सल सुरू ठेवण्यास मुभा दिल्याने याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहेच, त्याचबरोबर याचा जास्त फटका कामगारांना बसला असून यात रोज लागणाऱ्या पोळी-भाकरी बनवणाऱ्या महिलांचाही रोजगार हिरावला गेला आहे. वसई, विरार, नालासोपारामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून आता दिवसभरातील रुग्णांचा आकडा ८००वर गेल्याने प्रशासनाने सर्व आस्थापने बंद केली आहेत. यामध्ये हॉटेल पूर्णपणे बंद करत केवळ पार्सल सेवा ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेक कामगारांना कामावरून कमी केले. यामुळे कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. यात पोळी-भाकरी बनवण्याची कामे करत असलेल्या महिलांनाही आता रोजगाराला मुकावे लागणार आहे, तर काहींना संसाराचा गाडा चालवण्यासाठी इतर व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने वर्षभरात हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकदा अटी-शर्तीवर हा व्यवसाय सुरू ठेवावा लागला. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये ते लवकर संपेल, या आशेवर हॉटेल मालकांनी कामगारांना आर्थिक हातभार लावला, मात्र लॉकडाऊन वाढत गेले व काही महिने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. तांदळाची भाकरी प्रसिद्धवसई तालुक्यात तांदळाची हातभाकरी प्रसिद्ध असून अनेक हॉटेलमध्ये ती मिळते. मांसाहारी खाणारे ही भाकरी खाण्यासाठी खास वसईत येतात. हॉटेल व्यावसायिक गावामध्ये जाऊन महिलांकडून या भाकरी बनवून घेतात. यामुळे गावातील महिलांना मोठा रोजगार निर्माण झाला होता, पण या लॉकडाऊनने तो हिरावून घेतल्याने आता जगायचे कसे? हा प्रश्न या महिला वर्गासमोर उभा ठाकला आहे.व्यवसाय सुरू होताच आता पुन्हा पार्सल सेवा सुरू केल्याने पोळी-भाकरीची मागणी कमी झाल्याने या महिला कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. पोळी-भाकरी करण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहोत. लॉकडाऊनमध्ये आता हॉटेल सुरू नसल्याने अनेकींना या रोजगाराला मुकावे लागले आहे. - सुलभा जाधवभाकरी आम्ही घरी बनवून हॉटेलमध्ये देत होतो. यामुळे घरी आम्हाला काम मिळत होते, पण हॉटेल बंद असल्याने हे काम बंद झाल्याने आता दुसरे काम शोधावे लागणार आहे.     - भारती बुजडआता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचे कसे?वसई तालुक्यातील हॉटेल संख्या  २८० पोळी-भाकरीसाठी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या २२००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या