शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

Coronavirus: धरण उशाला, कोरड घशाला! आदिवासींवर कोरोनासोबतच पाणीटंचाईचे दुहेरी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:19 IST

२१ गावे, ४७ पाड्यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

रवींद्र साळवे 

मोखाडा : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून रोजच्या उदरनिर्वाहासोबतच आता पाणीटंचाईचे संकटही त्यांना भेडसावते आहे. तालुक्यातील धामणी शास्त्रीनगर, स्वामीनगर, सातुर्ली अशी सात गावे आणि गोळ्याचा पाडा, नावळ्याचा पाडा, दापटी-१, दापटी- २, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंड्याचीपाडा, ठाकूरपाडा, पोºयाचापाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशी २१ गावे आणि ४७ पाडे अशा एकूण ६८ गावपाड्यांना २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्याची लोकसंख्या आता लाखांवर पोहोचली असून येथे खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा अशी पाच मोठी धरणे आहेत. तरीही ‘धरण उशाला, कोरड घशाला’, अशी परिस्थिती आहे. या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवांना झालेला नाही.

येथील परिस्थिती बघता दरवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईची समस्या त्रास देते. एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होतो. त्यामुळे येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातील कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. पाणीपुरवठा करणाºया विहिरींपासून टंचाईग्रस्त गाव-पाडे २० ते २५ कि.मी. अंतरावर असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते.

प्रचंड पाऊस होऊनही शून्य नियोजनामुळे येथे दरवर्षी ही पाणीटंचाईची समस्या त्रास देते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० कि.मी. अंतरावर मुंबईला शासनाने पाणी पोहोचवले आहे; परंतु धरणालगतच्या ४ ते ५ कि.मी. अंतरावरील गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहिरीतील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघुपाटबंधारे, वनविभागाचे बंधारे, नळपाणी पुरवठा योजना, सिंचन विहिरी यांसह सेवाभावी संस्थांनी बांधलेले बंधारे यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. याचबरोबर बºयाच ठिकाणी पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले. याचा फायदा नेमका किती झाला याचे उत्तरही प्रशासनाकडे नाही. महिलांची पाण्यासाठीची पायपीट काही कमी होताना दिसत नाही.महिलांची पायपीट थांबेनाप्रातिनिधिक स्वरूपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचा पाडा येथील विहिरीजवळ बंधारा बांधण्यात आला. तरीही हे गाव पाणीटंचाईमध्ये प्रथम क्रमांकावर असून टँकरशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास दिले असल्याने टँकर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा प्रत्यय नुकताच टंचाईग्रस्त गावपाड्यांना आला आहे. पाणीटंचाईच्या नावाखाली आजतागायत पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही महिलांची पाण्यासाठीची पायपीट कमी झालेली नाही. गेल्या वर्षीदेखील अशीच परिस्थिती होती. तेव्हा टंचाईग्रस्त गावपाड्यांनी शंभरी गाठली होती. त्याला ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई