शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Coronavirus: कोरोनाबाधेवर मात केलेले म्हणताहेत, डर के आगे जीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 23:15 IST

डाॅक्टरांचा न घाबरण्याचा सल्ला : अन्य आजारांकडे लक्ष देण्याची गरज

सुनील घरतपारोळ : वसई तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, हा चिंतेचा विषय असून, कोरोनाबद्दलची भीती हेही काही रुग्णांच्या बाबतीत मृत्यूचे कारण ठरत आहे. कोरोनाबाबत असणारी भीती, त्यामुळे येणारे दडपण, यामुळे उपचारासाठी होणारा उशीर तसेच काही रुग्णांना असणारे दुर्धर आजार यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान, डर के आगे जीत है, कोरोना बरा होतो, हेही बाधित होऊन बरे झालेल्या अनेक नागरिकांनी दाखवून दिले आहे.

कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा या आजाराचा सामना करण्याची आज रुग्णांना गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग व सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. दरम्यान, वसई तालुक्याच्या शहरी भागात ३७ हजार ७१२ आणि ग्रामीण भागात १ हजार ४३४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. जर कोरोनाचा आपण धीटपणे सामना केला तर विजय आपलाच आहे, असे कोरोनामुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

आज वसई तालुक्यात कोरोना झाल्यानंतर त्यातून हजारो रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाबत सरकारी व खासगी यंत्रणा अधिक गंभीर असून, रुग्णाच्या उपचारात कुठलीही कसर सोडली जात नाही; पण उपचारासाठी रुग्णही मानसिकदृष्ट्या समक्ष असला पाहिजे. रुग्णांनी या आजाराची भीती बाळगली नाही तर या आजारातून लवकर बरे होतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोनाची भीती हे कोरोना रुग्णाचे मृत्यूचे मोठे कारण मानले जात आहे. आपल्याला कोरोना झालाय याची प्रचंड भीती रुग्णाच्या मनात असते. त्यामुळे जगण्याचे मानसिक बळ कमी होत आहे. कोरोनाबद्दलच्या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाची भीती व मानसिक दडपण हे कोरोना उपचारात बाधा ठरत असले तरी आज कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांची संख्या मोठी असून, भीती नसेल तर कोरोनावर विजय निश्चित आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे