शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढताना भेडसावतो आहे किराणा मालाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:41 IST

धुंदलवाडीच्या कातकरीपाड्यावरील नागरिकांची फरफट

बोर्डी : धुंदलवाडी गावच्या मुंबईपाड्यासह अन्य कातकरी पाड्यावरील आदिवासींकडे संसारोपयोगी किराणा साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही वेळच्या जेवणात केवळ भातावरच पोट भरण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान, शासनाने रेशन दुकानांवर अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी या गरजू लोकांकडून होत आहे.

दीड वर्षांपासून धुंदलवाडी हे गाव वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांसाठी ओळखले जात असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगतात. या गावच्या कातकरी पाड्यावरील बहुतेक आदिवासींकडे स्वत:च्या मालकीची शेतजमिनी नसून स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांना परगावातील बांधकाम आणि विटभट्टी व्यवसायासाठी स्थलांतरित व्हावे लागते. लॉकडाउन लागू झाल्याने त्यांना गावात परतावे लागले आहे. दीड महिन्यांपासून हाताला काम नसल्याने रोजंदारीवर उदरनिर्वाह चालविणाºया या कुटुंबियांच्या गाठीला पैसा नाही. शासनाने रेशन दुकानांद्वारे त्यांना तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे.

सकाळी उठल्यापासून दोन कप चहासाठी चहा पावडर नसते. तर दुपार आणि रात्रीच्या जेवणात डाळ, तेल, मीठ, मसाला, हळद यांची वानवा असल्याने असे पदार्थ खायला कुटुंबातील सदस्य धजावत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ताटात कोणता पदार्थ वाढावा या समस्येने महिलांचे डोके चक्रावले आहे. एकीकडे कोरोनाशी लढताना शहरातील नागरिक दर तासाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करून या आजारापासून स्वत:चा बचाव करीत आहेत. तर दुसरीकडे येथील ग्रामस्थांना आंघोळीचा आणि कपड्यांचा साबण घ्यायला हाती पैसा नसल्याने शारीरिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लॉकडाउन काळात अन्य राज्यातील मजूर, नागरिक, प्रवासी यांच्यासाठी निवारा केंद्र उभारून तेथे त्यांच्या राहण्यासह नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था केली गेली. तर शहरी वस्तीनजीक राहणाºया नागरिकांना विविध संस्थांनी खाण्या-पिण्याच्या वस्तूंप्रमाणेच महिना-दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य उपलब्ध करून दिले. मात्र या गावातील कातकरी पाड्यावर अद्याप कुणीच फिरकलेले नाही.केवळ शासनाने स्वस्त धान्य दुकानातून दिलेल्या तांदळवर संपूर्ण कुटुंबाची भिस्त अवलंबून आहे. परंतु हे किती दिवस चालेल, असा प्रश्न येथील कातकरीपाड्यावर राहणाºया दिनेश भसरा याने केला आहे. भूकंपाच्या भयाखाली वावरणाºया ग्रामस्थांना कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी कुचंबणा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाने रेशन दुकानांद्वारे येथील ग्रामस्थांसाठी तांदळाचा पुरवठा केला. मात्र संसारोपयोगी अन्य आवश्यक वस्तूंचा त्यांच्याकडे तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे दात्यांकडून मदतीचा हात का मिळू नये, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस